नॅशनल टेस्टिंग एजन्सी द्वारे घेतल्या जाणाऱ्या UG नीट परीक्षेसाठी दयानंद कला महाविद्यालय सुसज्ज

नॅशनल टेस्टिंग एजन्सी द्वारे घेतल्या जाणाऱ्या UG नीट परीक्षेसाठी दयानंद कला महाविद्यालय सुसज्ज

लातूर (प्रतिनिधी) : The National Eligibility cum Entrance Test (UG)- NEET- 2021 या परीक्षेसाठी दयानंद कला महाविद्यालयात एकूण 720 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. covid-19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यार्थी, प्राध्यापक कर्मचारी यांचे आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून सर्व परिसर स्वच्छ करून घेतला आहे . सर्व रूम सॅनिटाईझ करून घेतल्या आहेत. प्रवेशा पासूनच विद्यार्थ्यांना अंतर राखून प्रवेश करता यावा यासाठी ठीक ठिकाणी पाऊलखुणा देण्यात आलेल्या आहेत. महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर बैठक व्यवस्था बॅनर स्वरूपात लावण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी प्रवेशद्वारावर रांगोळीने सजावट करण्यात आली आहे. एकूणच सर्व दृष्टीने उद्याच्या परीक्षेसाठी महाविद्यालय सुसज्ज आहे. या परीक्षेकरीता महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी आदी परीश्रम घेत आहेत.

About The Author

error: Content is protected !!