रुग्ण कल्याण समितीचे सदस्य हुसेनभाई मणियार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील ग्रामीण रुग्णालय रुग्ण कल्याण समितीचे सदस्य हुसेन मणियार यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला आहे. यावेळी आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते भव्य रक्तदान शिबिराचे उदघाटन करण्यात आले,तसेच पत्रकार बांधवांचा सत्कार, रुग्णांना फळे वाटप, सुखमणि वृद्धाश्रमात फळे वाटप, स्वच्छता कर्मचार्यांना साडी वाटप, अशा विविध उपक्रमाने वाढदिवस साजरा करण्यात आला आहे.
नुकतीच ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण समितीच्या सदस्यपदी निवड झालेले हुसेन मणियार यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी अहमदपूर मध्ये मोठ्या थाटामाटात व गरीब जनतेला फळे वाटप ,साडी वाटप ,करून तसेच पत्रकार बांधवांचा सत्कार करून ग्रामीण रुग्णालय येथे साजरा करण्यात आला. ग्रामीण रुग्णालय येथे हे रक्तदान शिबिर घेण्यात आले यावेळी 41 जनानी रक्तदान करूण 41 बाटल्याचे रक्त संकलन करण्यात आले.
वाढदिवसाच्या निमित्ताने व विविध उपक्रम राबवून हुसेन मणियार यांनी आपला वाढदिवस अनोख्या पध्दतीने साजरा करूण पदाधिकारी यांना आदर्श घालून दिला यावेळी आमदार बाबासाहेब पाटील ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाउपाध्यक्ष
शिवानंद तात्या हिंगणे, वैदयकीय अधिक्षक डाँ बिराजदार साहेब,डॉ. सिंहाते साहेब,जि.प.सदस्य माधव जाधव,तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, शहराध्यक्ष अझक्षरभाई बागवान,पापा आया,नगरसेवक अभय मिरकले,सय्यदलाल सरवर,प्रशांत भोसले, अन्वर बागवान, फिरोज शेख, आशिष तोगरे, अशोक सोनकांबळे, दयानंद पाटील,चंद्रशेखर भालेराव आदी मान्यवर मंडळी व तसेच रुग्णालयातील कर्मचारी पत्रकार बांधव व अनेक मान्यवर याठिकाणी उपस्थित होते.