राजमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्री व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी
अहमदपूर (गोविंद काळे) : राष्ट्रमाता राजमाता माँ जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व स्वामी विवेकानंद यांची जयंती छत्रपती शिवाजी महाराज चौक अहमदपूर येथे मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेड यांच्या वतीने साजरी करण्यात आली.
याप्रसंगी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अशोक चापटे, उपाध्यक्ष प्रा.मारोती बुद्रुक पाटील, पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे विभागीय कार्याध्यक्ष धनंजय उजनकर, भाजपाचे नेते अमित रेड्डी, मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष भिमराव कदम, शहर सचिव सचिन जगताप, संभाजी ब्रिगेड विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब कदम,गणपतराव जाधव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस महेशराव देवणे,सेवा संघाचे शहर उपाध्यक्ष प्रा. गोविंदराव भगत,शहर सचिव गजानन हाडोळे, सहसचिव श्रीधर तराटे, तालुका प्रसिद्धीप्रमुख चक्रधर पवार,धीरज गलाले, मुख्याध्यापक गफार शेख, संघटक दशरथ जाधव, संदीप कदम, गजानन गुरनाळे माजी ग्रामसेवक एन. डी. राठोड कुमारी दुर्गाशक्ती कदम आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विश्ववंदनीय युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.