नूतन सभापती शांतवीर कन्नाडे यांचा सत्कार

नूतन सभापती शांतवीर कन्नाडे यांचा सत्कार

उदगीर (प्रतिनिधी) : आज सकल जंगम समाज चॅरिटेबल ट्रस्ट उदगीर च्या वतीने देवणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी
शांतवीर बसलींगप्पा कन्नाडे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून तमाम उदगीर करांचे श्रद्धास्थान असलेले हावगीस्वामी मठाचे मठाधिपती श्री.श्री.डॉ.ष.भ्र.१०८ शंभूलिंग शिवाचार्य महाराज अध्यक्ष म्हणून उदगीर जंगम समाजाचे प्रसिद्ध व्यापारी विजय कुमार स्वामी, मा.श्री.प्रा.डॉ.मल्लेश झूंगा स्वामी, श्री.महालिंगअप्पा देवर्षे,
श्री.मल्लिकार्जुन चांदेगावकर, मल्लिकार्जुन होकर्णेकर,
श्री.रामलिंग झुंगा, श्री.महेश झुंगा स्वामी, श्री.नागेश स्वामी,पत्रकार श्री.महेश मठपती, श्री.निरंजन अप्पा कन्नाडे, श्री.निजगुनअप्पा कन्नाडे, क्षेमानंद कन्नाडे, श्री.मल्लिकार्जुन हाडोळतीकर, गणेश स्वामी, आदी समाज बांधव उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!