बाबुराव कनाळे यांच्या घरी फुलले ब्रम्हकमळ

बाबुराव कनाळे यांच्या घरी फुलले ब्रम्हकमळ

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील बाबुराव कनाळे यांच्या घरी ब्रम्हकमळ फुलले होते. याबाबत अधिक माहिती अशी की, श्रावण महिना ते गणपती या कालावधी मध्ये मध्यरात्री उगवणारे ब्रम्हकमळ प्रकृतीचे अनुपम व आकर्षक रूप आहे. ब्रम्हकमळ हे वर्षातून एकदाच फुलत असल्याने ते दुर्मीळ असुन आकर्षक, मोहक असुन त्याचा सुगंध सर्वत्र दरवळतो. यावर्षी अधीकचा महिना अगोदर आल्याने श्रावणा अगोदरच हा दुर्मीळ योग साधला गेला असल्याचे जाणवत आहे. अहमदपूर येथील गोपीनाथ मुंढे नगर, आय. टी.आय. शेजारी येथील रहीवाशी बाबुराव नारायणराव कनाळे व सौ. शकुंतलाबाई बाबुराव कनाळे यांच्या घरी शनिवारी रात्रीला ब्रह्मकमळ फुलले. यावेळी मुलगा प्रा. व्यंकट बाबुराव कनाळे व सौ. कविता व्यंकटराव कनाळे यांनी विधिवत उमललेल्या ब्रम्हकमळाची पुजा केली.

यावेळी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना बाबुराव कनाळे म्हणाले की, या दुर्मिळ ब्रम्हकमळाला काटे नसतांत त्यांची पाने मासंल व हिरवी पोपटी लांबट असतात. अंधार्‍या रात्री फुलणार्‍या हया ब्रम्हकमळावर किटकांना पराग सिंचनासाठी आकर्षित करण्याचा हेतु असतो. निवडुंग कुळातील हे ब्रम्हकमळ ऐफिफायलम बीन्यानमध्दाह जात, मळु मेक्शकोए मध्ये अमेरिका इत्यादी भागात बागेची शोभा वाढविण्यासाठी भारतात आणली गेली होती. या फुलाचा पानासारखा दिसणारा हिरव्या रंगाचा भाग हे या वनस्पतीचे खोड अनुकांडे म्हणतात. पकडायला असणार्‍या खाचेतुन या ब्रम्हकमळाचा उगम होतो. पांढर्‍या रंगाची 4 ते 12 इंच लांबीची ही फुले जनु, ऑगस्ट ते सष्टेंबर महिन्यात उगवतात. कळी मोठी होते तसे फुल हळु हळु रात्री 12 वाजेपर्यत हे ब्रम्हकमळ पुर्ण फुलते. कॅक्टस वर्गातील एक हे एक दुर्मिळ झुडुप आहे. परंतु याचे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे याच्या पानांना काटे नसतात. पाने मांसल, लांबट, पोपटी हिरव्या रंगाची असतात. त्या पानांवरच पावसाळ्यात वर्षातून एकदा आकर्षक, सुगंधी पांढर्‍या रंगाची फुले येतात. ही फुले वर्षातून एकदा, जुलै ते सप्टेंबरच्या दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास पूर्ण उमलतात, व सकाळपर्यंत कोमेजतात. या निसर्गातील जेवढ्या वनस्पती असतील त्या प्रत्येक वनस्पतीचे वेगळे महत्त्व आहे. ब्रम्हकमळाचे झुडुप जरी आकर्षक नसले तरी फुल मात्र मनाला आणि वातावरणाला प्रसन्‍न करणारे असते असेही बाबुराव कनाळे शेवटी म्हणाले. यावेळी श्रीनिवास व्यंकटराव कनाळे, वेदांत व्यंकटराव कनाळे, प्रा. मारोती बुद्रुक पाटील, सौ. सविता मारोती बुद्रुक पाटील, प्रा. बालाजी कारामुंगीकर, सुप्रिया कारामुंगीकर, कु.रोजश्री कारामुंगीकर आदींची उपस्थिती होती.

About The Author