रक्तदान काळाची गरज – आ. बाबासाहेब पाटील
चापोली (गोविंद काळे) : आजच्या कोरोनाच्या परस्थीतीत रक्तदान ही काळाची गरज असून चापोली येथील श्री ओम बाल गणेश मंडळाच्या वतीने रक्तदान सारखं पवित्र कार्य हाती घेणे हे कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य पणन महासंघाचे चेअरमन तथा चाकूर अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी चापोली येथे केले. ते. दि. 14 सप्टेंबर रोजी येथे आयोजित श्री ओम बाल गणेश मंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून आमदार बाबासाहेब पाटील बोलत होते यावेळी व्यासपीठावर यावेळी अर्जुन मद्रेवार,बाबुराव शिंदे, गंगाप्रसाद मद्रेवार, माजी पं स सदस्य निलेश मद्रेवार, सुरेश शेवाळे, गणेश स्वामी, विश्वनाथ पाटील,व्यंकटेश शिंदे, देविदास माने, आबासाहेब माने, अजिज शेख, सह आदी उपस्थित होते. या रक्तदान शिबीर यशस्वीतेसाठी गणेश मंडळाचे अध्यक्ष शंकर कदम, शैलेश कासनाळे, बसवराज स्वामी, योगेश कासनाळे, प्रशांत श्रीमंगले, सोमेश स्वामी, शिवा स्वामी, ओम आलमले, रितेश कासनाळे, स्वामी शिवशंकर, विशाल स्वामी, कृष्णा होनराव, वेदांत होनराव, विजय तत्तापुरे, मंगेश स्वामी, स्वामी कैलास, गणेश स्वामी, गणेश होनराव, राम जकाले सह आदींनी पुढाकार घेतला. या रक्तदान शिबिराला प्रारंभ महिलांच्या रक्तदानाने करण्यात आला यावेळी सौ. पुजा सोमेश स्वामी, कु. संपदा नरसिंह भगवे यांच्या रक्तदानाने करण्यात आला. या रक्तदान शिबिरास जवळजवळ पन्नास रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला.