उदगीर किल्ला जतन व दुरुस्तीसाठी 4 कोटी 88 लक्ष रु निधी मंजूर
उदगीर (अॅड.एल.पी.उगीले) : उदगीर किल्ल्याच्या दुरुस्ती आणि जतन करण्यासाठी ना. श्री संजयभाऊ बनसोडे यांच्या प्रयत्नाने 4 कोटी 88 लक्ष इतका निधी मंजूर करून घेतला आहे. यापूर्वी स्व.चंद्रशेखर भोसले साहेब आमदार असताना निधी आला होता. आता यानंतर ना. संजयभाऊ बनसोडे साहेबांनी हा निधी मंजूर करून घेतला आहे. यामुळे उदगीर तालुक्याच्या इतिहास आणखी उजळून दिसेल. खरेतर उदगीरकरांना आता कायम उत्कंठा असते की, उदगीरकरांसाठी आणखी काय मोठी घोषणा होते? मग ते प्रशासकीय इमारत,पंचायत समिती इमारत, एम आय डी सी,उदगीर शहरातील दोन उड्डाणपूल, तिरु नदीवरील बॅरेजेस,नाट्यगृह, शादीखाना,बौद्धविहार,लिंगायत भवन,अण्णाभाऊ साठे स्मारक,उदगीर ते तोंडार रस्ता रुंदीकरण आशा अनेकविध योजना उदगीरच्या जनतेसाठी रोज मंजूर होत आहेत,विकासाचा ध्यास बाळगुन मतदार संघाच्या विकासाचा भला मोठा बॅकलाॅग भरून काढण्यासाठी ना.संजय बनसोडे ज्या गतीने विकास निधी खेचून आणत आहेत ते कौशल्य निश्चित वाखाणण्याजोगे आहे.त्यांच्या या चौफेर विकास कामामुळे ते अजातशत्रु बनले आहे.विकास कामासाठी राजकिय विचारधारेचे जोडे बाजूला ठेवून सर्वांना सोबत घेऊन काम करत आहे. त्यांची कामाची शैली आणि गती इतर आमदारांनी अनुकरावी अशीच आहे.असे म्हटले तर वावगे होणार नाही.