उत्कृष्ट गौरी सजावटीस सृजन संस्थेकडून गौरव

उत्कृष्ट गौरी सजावटीस सृजन संस्थेकडून गौरव

अहमदपूर (गोविंद काळे) : सृजन बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने गौरी पुजन व समोर करण्यात येणाऱ्या गौरी सजावट यामध्ये उत्कृष्ट सजावट करणाऱ्या भगिणीचे संस्थेच्या वतीने गौरव करण्याचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी आँनलाईन अवाहान करण्यात आले असून या स्पर्धेत चांगल्या तीन गौरी सजावटीला गौरव पत्र देऊन गौरविण्यात आले. गौरी पुजन म्हणजे घरातील पुजनाची तयारी साठी सर्वांचीच धावपळ होत असते.त्यातच माता भगिनीला खूप कामे करावी लागतात.यांचे पण गौरव केला जावा याच उद्देशाने सृजन संस्थेने हा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेऊन आँनलाईन वाँटस अँप द्वारे आवाहान करण्यात आले. यात पहिल्या तीन सजावटीस विशेष गौरव पत्र व सहभागी सर्व भगिनीचे संस्थेच्या वतीने प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. वरील उपक्रमासाठी महादेव खळुरे, अविनाश धडे, बालाजी पांचाळ, पद्मा कळसकर, शिवकुमार पवार, सलिम आतार,तुकाराम देवकत्ते आदिनी परिश्रम घेतले.

About The Author

error: Content is protected !!