वर्ताळा तांडा ता. मुखेड येथे वृक्षारोपण संपन्न

वर्ताळा तांडा ता. मुखेड येथे वृक्षारोपण संपन्न

मुखेड (गोविंद काळे) : विमुक्त जाती सेवा समिती वसंतनगर संचलित ग्रामीण (कला, वाणिज्य व विज्ञान) महाविद्यालय, वसंतनगर ता. मुखेड अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभाग व स्व.भुराबाई पवार प्रतिष्ठान वर्ताळा तांडा यांच्या संयुक्त विद्यमाने दि.११ सप्टेंबर २०२१रोजी वर्ताळा तांडा ता. मुखेड जि. नांदेड येथे वृक्षारोपण करण्यात आले. या वक्षारोपणात पिंपळ, जांब,करंजी, कडूनिंब, सागाची झाडे, आधी जातीच्या ७५ वृक्षांची लागवड करण्यात आली.

वृक्ष लागवड कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरिदास राठोड, स्व. भुराबाई पवार प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागात कार्यरत प्रा. देविदास पवार, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. शंकरय्या कळ्ळीमठ, प्रा.एस. बाबाराव, माजी प्राचार्य तथा प्रसिद्धी प्रमुख प्रा. डॉ.रामकृष्ण बदने, वर्ताळा तांडा येथील उपसरपंच राजू राठोड, मुख्याध्यापक रामराव राठोड, सहशिक्षक पांडुरंग शिंदे, गोविंद राठोड,शाम राठोड,सुधाकर राठोड, नामदेव राठोड, सेवानिवृत्त शिक्षक मोहन राठोड, आनंद राठोड, संजय पवार, जेष्ठ नागरिक परशूराम पवार, अमोल पवार, गणेश पवार, दिलीप पवार व प्रतिष्ठानचे सर्व सदस्य आदि मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच रासयो स्वयंसेवकांनी वृक्षारोपणासाठी श्रमदानातून खड्डे खोदणे व वृक्ष लागवड करणे इत्यादी कामे केली. त्यानंतर सर्व स्वयंसेवकांना अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली.

About The Author