इकोफ्रेंडली गणेश मूर्ती स्पर्धेचे निकाल जाहीर

इकोफ्रेंडली गणेश मूर्ती स्पर्धेचे निकाल जाहीर

अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सृजन बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे नाविन्यपूर्ण उपक्रम

अहमदपूर (गोविंद काळे) : सृजन बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने मुलांच्या कल्पक्तेला व कलागुणांना वाव मिळावा म्हणून भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्य गणेश चतुर्थीचे औचित्य साधून आँनलाईन इकोफ्रेंडली गणेश मूर्ती तयार करणे ही स्पर्धा आयोजित केली होती.या स्पर्धेचे निकाल आँनलाईन यूटूब लिंकच्या माध्यमातून घोषित करण्यात आला.

गणेशोत्सव हा सण दरवर्षी देशात मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. या सणाच्या निमित्ताने भाविक गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणून त्यांची मनोभावनेने पूजा करतात. परंतु यावर्षीही कोरोनाच्या संसर्गामुळे हा उत्सव साध्या पद्धतीने साजरा केला जात आहे. कारण यावेळी सोशल डिस्टन्सिंगचं भान बाळगून कुठेही गर्दी न करता हा सण आपण साजरा करावे असे शासनाने आदेश दिले आहे.

श्री गणरायाचा उत्सव म्हणजे आपल्या सर्वांसाठीच आनंदाचा सोहळा! पर्यावरणाच्या संवर्धनासाठी इको फ्रेंडली गणोशोत्सव साजरा करावेत. याबात संस्थे मार्फत जनजागृती करण्यात आली. आँनलाईन माध्यमातून विद्यार्थ्यांना आपली इको फ्रेंडली उत्सवाची संकल्पना इतरांनाही दाखवता आली. इको – फ्रेंडली बाप्पा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी काही सूचना देण्यात आलेले होते.या सूचनेचे पालन करुन मुलांनी पर्यावरण पूरक लाल माती,शाडू माती याचा वापर करुन विविध फळांच्या व झाडांच्या बियांचे मूर्ती मध्ये रोपन करुन अशा मूर्ती विद्यार्थ्यांनी तयार केले.काही विद्यार्थींनी कडधान्यांचाही वापर केला आहे.
पर्यावरणपूरक पद्धतीने सण साजरा करण्यासाठी सृजन संस्था जनजागृती पर उपक्रमातून कार्य करीत आहे.

कर्नाटक राज्यातील राज्यपुरस्कार प्राप्त उपक्रमशील कला शिक्षक ईरण्णा बी.बबलेश्वर यांच्या हस्ते १२ सप्टेंबर रोजी यूटूब लिंक द्वारे आँनलाईन निकाल घोषित करण्यात आला. इकोफ्रेंडली गणेश मूर्ती स्पर्धा दोन गटात आयोजित केले होते.यामध्ये वय वर्ष १ ली ते ७ वी व ८ वी ते १२ वी वी असे दोन्हीही गटाचा खालील प्रमाणे निकाल घोषित करण्यात आला आहे.लहान गटात सर्व प्रथम-सुमेध काष्टे,रिसोड द्वितीय- अभिनव नेरकर,धुळे तृतीय-श्वेता पिसाळ उत्तेजनार्थ श्रीकृष्ण गायकवाड,पाथरी तर मोठ्या गटातून प्रथम-ऋतुजा कोकणे,लातूर द्वितीय- वैष्णवी वाघमारे अहमदपूर तृतीय-श्रेयश देशमुख,बोरिवली उत्तेजनार्थ वेदान्त लाड,सिद्धात्री लासुणे, उदगीर या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. या आँनलाईन इकोफ्रेंडली गणेश मूर्ती स्पर्धेत ९०विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.स्पर्धेचे निकाल यूटूब चँनेलच्या माध्यमातून आँनलाईन घोषित करण्यात आला. स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांना फोन पे द्वारे रोख रक्कम व गुणवंत विद्यार्थ्यांना व सहभागी विद्यार्थ्यांना आँनलाईन ई-सर्टिफिकेट देऊन गौरव करण्यात आले. वरील स्पर्धेसाठी किरण खमितकर, केदार खमितकर महादेव खळुरे, सलिम आत्तार, मल्लपा खळुरे, बालाजी पांचाळ, शिवकुमार पवार, नदिम सय्यद आदिनी परिश्रम घेतले.

About The Author