श्यामलाल हायस्कूल मध्ये मराठवाडा मुक्ती संग्रामदिन उत्साहात साजरा

श्यामलाल हायस्कूल मध्ये मराठवाडा मुक्ती संग्रामदिन उत्साहात साजरा

उदगीर : येथील श्यामलाल हायस्कूल मध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी ध्वजारोहणाचा कार्यक्रम माननीय बी.डी. कुलकर्णी सरांच्या हस्ते संपन्न झाला. ध्वजारोहणासाठी प्रमुख अतिथीस पाचारण श्री सोनाळे बी. एस. यांनी केले ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाप्रसंगी शामलाल स्मारक शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष ऍड.सुपोषपाणिजी आर्य सर, उपाध्यक्ष माननीय गिरीशजी मुंडकर सर, सचिव ऍड.विक्रमजी संकाये सर सहसचिव श्रीमती अंजुमणीताई आर्य तसेच उदगीर शहरातील प्रसिद्ध विधिज्ञ माननीय श्री गुलाबराव पटवारी, जेष्ठ पत्रकार माननीय श्री मोतीपवळे राम, श्यामलाल सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल श्री शिरसे सर, श्री देवर्षे सर, फुलारी सर इ. मान्यवर उपस्थित होते. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त देशभक्तीपर गीत गायन श्री बागडे सर यांनी केले. मानसी जाधव, कांडेकर सोनाक्षी, बिरादार मन्मथ या विद्यार्थ्यांनी मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त प्रभावी भाषेत ऑनलाइन मनोगत व्यक्त केले. ध्वजारोहण कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे शाळे तर्फे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री उमाकांत सूर्यवंशी यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री देबडवार संजय यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.

About The Author

error: Content is protected !!