पोस्ते पोदार लर्न स्कूल मध्ये 74वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा

पोस्ते पोदार लर्न स्कूल मध्ये 74वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा

उदगीर : दि.17 सप्टेंबर रोजी पोस्ते पोदार लर्न स्कूल मध्ये “17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन” उत्साहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी कै.काशिनाथ पोस्ते बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेचे सचिव सुरज पोस्ते यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्रिन्सिपल सूर्यकांत चवळे होते.

या कार्यक्रमाप्रसंगी प्रिन्सिपल सूर्यकांत चवळे यांनी 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्रामाविषयी सविस्तर अशी माहिती सांगितली.रजाकाराच्या विविध घटना व प्रसंगाविषयी सांगितले,तसेच या मराठवाडा मुक्तीसाठी अनेक लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांच्या कार्याला त्यांनी उजाळा दिला.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपक्रम समन्वयक स्वप्नाली पाटील, वरिष्ठ समन्वयक शेषेराव बिरादार, कनिष्ठ समन्वयक रेशमा सिद्धीकी, प्राथमिक समन्वयक वनिता सुगंधी, क्रीडा समन्वयक सावन जाधव, सिकंदर आडे, गजानन फुलारी व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.

About The Author

error: Content is protected !!