जिल्हयातील दारु विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश

जिल्हयातील दारु विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश

जिल्हाधिकारी यांचे आदेश

उस्मानाबाद (प्रतिनिधी) : जिल्हयातील एप्रिल 2020 ते डिसेंबर-2020 या कालावधीत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची सर्व सार्वजनिक निवडणुकीसाठी येत्या 15 जानेवारी-2021 रोजी मतदान तर 18 जानेवारी-2021 रोजी मतमोजणी होणार आहे. यादोन्ही दिवशी तसेच मतदानाच्या आदल्या दिवशी जिल्हयातील सर्व प्रकारच्या मद्य विक्री (दारुची) ची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले आहेत.

जिल्हयात ग्रामपंचायत निवडणुकीनिमित आदर्शआचार संहिता लागू आहे. या कालावधीत निवडणूक खर्चावर नियंत्रण ठेवणे, आर्थिक बळाचा दुरुपयोग टाळणे आणि मतदारावर प्रभाव टाकणाऱ्या वस्तुंच्या वाटपावर अंकुश ठेवण्यात येत आहे.त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र मद्य निषेध कायदा 1949 च्या कलम 142 अन्वये जिल्हाधिकारी यांना प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करुन जिल्हयातील सर्व प्रकारच्या मद्याची आणि दारुची दुकाने बंद ठेवावेत, असे आदेश देण्यात आले आहेत.मतदानापूर्वीचा एक म्हणजे दिवस 14 जानेवारी रोजी संपूर्ण दिवस, तसेच मतदानाच्या 15 जानेवारी 2021 रोजी संपूर्ण दिवस मद्य विक्रीची दुकाने बंद राहतील.18 जानेवारी 2021 रोजी जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने तहसीलदार निश्चित करतील. त्यानुसार ज्या तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे.त्या तालुका मुख्यालयाच्या हद्दीत मतमोजणी संपेपर्यंत मद्य विक्रीची दुकाने बंद राहतील, असेही जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!