शिवाजीराव हेंडगे यांचा राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हास्ते शिवरत्न पुरस्कार देऊन गौरव

शिवाजीराव हेंडगे यांचा राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हास्ते शिवरत्न पुरस्कार देऊन गौरव

लातूर ( प्रतिनिधी ) : श्री. केशवराज प्राथमिक विद्यालयाचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक माननीय श्री. शिवाजीराव हेंडगे यांना लातूर मिशन वृत्तपत्राचा आठवा वर्धापन दिन व शिवदर्शन फाउंडेशन, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने लोकनेते स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या स्मृती दिना निमित्ताने शिवरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.समाजातील सुप्त प्रतिभेचा व त्यांच्या कार्याचा या वृत्तपत्राच्या माध्यमातून सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमासाठी संजय बनसोडे राज्यमंत्री, हभप प्रशांत महाराज चव्हाण खानापुरकर
माजी आ अॅड त्रंबक भिसे , महापौर विक्रांत गोजमगुंडे जेष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील लातूर मिशन वृत्तपत्रचे संपादक तथा शिवदर्शन फाऊंडेशन अध्यक्ष भारत जाधव विचारमंचावर उपस्थित होते
श्री केशवराव प्राथमिक विद्यालय लातूरचे मुख्याध्यापक शिवाजीराव हेंडगे सर यांना पुरस्कार मिळाल्या बद्दल सर्वांसाठी खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे.
हेंडगे सर नेहमीच विद्यालयाच्या गुणवत्ते साठी, व संस्थेने नेमून दिलेल्या तसेच नवनवीन विविध समाजकार्यासाठी आग्रही असतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार मिळाल्या बद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे

About The Author

error: Content is protected !!