राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते सरपंच सूर्यकांत सुडे यांना शिवरत्न पुरस्कार प्रदान

राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते सरपंच सूर्यकांत सुडे यांना शिवरत्न पुरस्कार प्रदान

लातूर (प्रतिनिधी) : लातूर मिशन वृत्तपत्र व शिवदर्शन फाऊंडेशन,लातूर यांच्या संयुक्‍त विद्यमाने लोकनेते स्व.विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतीदिनानिमित्त कृष्णा मंगल कार्यालयात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे राज्यमंत्री संजय बनसोडे व ह.भ.प.रामायाणाचार्य प्रशांत महाराज खानापुरकर यांच्या हस्ते लातूर शहर मतदारसंघातील हरंगुळ (बु.) येथील सरपंच सूर्यकांत सुडे यांना लातूर मिशन वृत्तपत्र समुहा कडून दिला जाणारा मानाचा आदर्श सरपंच शिवरत्न पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी माजी आ.त्र्यंबकनाना भिसे, लातूर महानगरपालिकेचे महापौर विक्रांत गोजमगुंडे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे, राष्ट्रवादीचे प्रशांत पाटील, लातूर मिशनचे संपादक व शिवदर्शन फाऊंडेशनचे अध्यक्ष भारत जाधव, उपसंपादक परमेश्वर घुटे आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

About The Author