हेर येथे मोफत नेत्रतपासणी, मधुमेह,रक्तदाब शिबीर संपन्न
उदगीर (प्रतिनीधी) : तालुक्यातील हेर येथील प्राथमीक आरोग्य केंद्रामध्ये मधुर डायबिटीस सुपर स्पेशलिटी व उदयगीरी लाॅयन्स नेत्ररूग्णालय उदगीर यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत मधुमेह,रक्तदाब तपासणी व माफक दरात मोतीबिंदू शस्त्रक्रीया शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचे उदघाटण जि.प.सदस्या उषा रोडगे याच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्राथमीक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधीकारी डाॅ.रूपाली लोहकरे मॅडम, सरपंच सारिका अविनाश सूर्यवंशी, उपसरपंच तुळशिराम बेंबडे, बाबासाहेब पाटील, लक्ष्मण जाधव, शंकर रोडगे, अविनाश सुर्यवंशी, डाॅ. प्रशांत नवटक्के,शिबीर समन्वयक गणेश मुंडे, विष्णू पवार, प्रतिक जाधव, पांडूरंग माटेकर, श्रीरंग गायकवाड, ग्रा.से.बी.एस.मुसळे, विलास कांबळे, राम घोगरे, राज तवडे,सैफ डांगे आदी मान्यवर उपस्थीत होते.उपस्थीत मान्यवरांचा सत्कार ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आला.
यावेळी 120 नागरीकांची तपासणी करण्यात आली त्यात 20 नागरीकावर उदयगीरी लाॅयन्स हाॅस्पीटल उदगीर येथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे तर 13 नवीन मधुमेही रुग्ण व 28 जण रक्तदाबाचे रुग्ण आढळून आले. मधुमेहाची, रक्तदाबाची तपासणी केशव बिरादार, रुपेश भुईनर यांनी केली.