भारतीय जनता पार्टी लातूर शहर जिल्हा चिटणीस पदी निखील गायकवाड यांची निवड

भारतीय जनता पार्टी लातूर शहर जिल्हा चिटणीस पदी निखील गायकवाड यांची निवड

लातूर (प्रतिनिधी) : आपल्या कुटुंबातूनच समाजसेवेचे बाळकडू घेतलेले मनमिळावू व्यक्तिमत्व निखिल शिवाजी गायकवाड हे नेहमीच समाज सेवेस तत्पर राहिले आहेत. गरजूंना मदत करणे, प्रभागात सुविधा निर्माण करणे, गरजूंना अन्नदान असो किंवा नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या लोकांसाठी कपडे, ब्लॅंकेट अशा गरजेच्या वस्तूंचा पुरवठा करणे निखिल आपल्या विचारांच्या आपल्या सहकर्यांबरोबर नेहमी धावून जातात. कोव्हिड १९ काळात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी निखिल शिवाजी गायकवाड यांची निवड झाली. कोरोना संसर्गाचा धोका ओळखून लोकांना जमा करण्यापेक्षा सामाजिक अंतर राखून आंबेडकर पार्क येथे एलईडी बोर्ड लावला.

कोविड १९ च्या काळात विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी म्हणून साखळी तोडण्यासाठी राज्यात संचारबंदी आणि सीमाबंदी करण्यात आली होती. त्यामुळे सामान्य नागरिकांचे, हातावर पोट असलेल्या कामगारांचे हाल होत होते. अशा अडचणीच्या प्रसंगी तरुण कार्यकर्ते निखिल गायकवाड यांनी हडको प्रभागातील लोकांच्या घरोघर जाऊन दैनंदिन भाजीपाल्याचे मोफत वाटप केले. समाजसेवेचा ध्यास घेतलेले निखिल गायकवाड आणि त्यांच्या ग्रूप ने कडक लॅाकडाॅऊन मध्ये रमाई अन्नसेवा योजनेच्या माध्यमातुन दररोज पाचशेहून अधिक डब्बे कोव्हिड रुग्णाच्या नातेवाईकाना पुरविले. बौध्द जंयती निमित्त लातूर शहरातील बौध्द विहारात मोतीचूर लाडूचे वाटप केले. अशा सामाजिक कार्याची दखल घेवून अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती व ब्रिक्स ह्युमन राईट्स मिशन तर्फे समाजभूषण पुरस्कार देवून निखील शिवाजी गायकवाड यांना गौरवण्यात आले.

निखिल शिवाजी गायकवाड यांच्यातील समाजशील वृत्ती, संघटन कौशल्य, नेतृत्व गुणांची पारख करुन भारतीय जनता पार्टीने लातूर शहर जिल्हा चिटणीस पदी त्यांची नियुक्ती केली. ही नियुक्ती केल्याबद्दल मा. संभाजी पाटील निलंगेकर, खासदार सुधाकर शृंगारे, अभिमन्यू पवार, अरविंद पाटील निलंगेकर, सर्व मान्यवर नेत्यांचे मनस्वी आभार त्यांनी मानले. शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे सर, माजी शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, संघटन सरचिटणीस मनीषजी बंडेवार, दिग्विजय भैया काथवटे, विशाल जाधव, रागिणी यादव, रविशंकर केंद्रे, गुरुनाथ कल्लूरकर, मंडळ अध्यक्ष विशाल हवा, पवन आल्टे, धनु अवस्कर, ऋषी जाधव, नितीन गायकवाड, शशी पारवे, अभिषेक वाघमारे यांचेही ऋण व्यक्त केले.

About The Author