५१ किलो गांज्यासह १० लाख रुपयांचा मुद्येमाल जप्त

५१ किलो गांज्यासह १० लाख रुपयांचा मुद्येमाल जप्त

लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर पोलीस व राज्य उत्पादन शुल्क यांनी मुरुड येथील ऑटोमोबाईल च्या दुकानावर छापा टाकून 51 किलो गांजा सह 10 लाख 6 हजार रुपयांच्या मुद्येमालासह 3 आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेत मोठी कारवाई केली आहे.

सविस्तर माहिती अशी की, दि 19 डिसेंबर रोजी पहाटे 8 वाजता च्या सुमारास संयुक्त पथकातील अधिकारी सपोनि महादेव गोमारे, पोलीस ठाणे गातेगाव येथील प्रभारी अधिकारी सपोनि विलास नवले तसेच दुय्यम निरीक्षक आर.जी.राठोड राज्य उत्पादन शुल्क लातूर तसेच पोलीस अमंलदार वाहिद शेख, राम ढगे, महेश पारडे, अभिमन्यू सोनटक्के, बिलापटे, खडके यांना मिळालेल्या गुप्त माहीती वरुन मुरुड येथील मुरुड लातूर जाणार्या रस्त्यावरील ओमसाईराज ऑटोमाबाईल्स दुकानावर छापा टाकून त्याठिकाणी 3 पोत्यामध्ये 51 किलो बी मिश्रीत गांजा किमंत अंदाजे 3 लाख 6 हजार रुपय किंमतीचा व गांज्याची वाहतुक करण्यासाठी वापरलेली 2 वाहने असा एकुण 10 लाख 6 हजार रुपयाचा मुद्येमालासह ओमसाईराज अॅटोमोबाईल्स मालक गोविंद दिगांबर खोसे (वय 35 रा. माटेफळ), युवराज तात्याराव काळे (वय 30 रा. दत्तनगर, मुरुड), सुनिल रोहीदास शिंदे (वय 23 रा. मांडवा ता.वाशी जि.उस्मानाबाद) यांना ताब्यात घेण्यात आले. सदर गांजा विषयी आरोपी गोविंद खोसे यांच्याकडे विचारना केली असता त्याने सांगितले की, युवराज काळे व सुनिल शिंदे यांनी त्यांचे मंहिद्रा सुप्रो (मिनी व्हॅन) क्रमांक एम एच 25 ए.एल 9014 मध्ये बाहेरगावावरुन गांजा घेवुन आले असुन सदर गांजा हा लातूर येथे आवश्यकतेनुसार मी माझी स्कॉरपिओ (एमएच 04 बी एन 5715) मध्ये घेवुन जावुन विक्री करतो असे सांगितले.

५१ किलो गांज्यासह १० लाख रुपयांचा मुद्येमाल जप्त
५१ किलो गांज्यासह १० लाख रुपयांचा मुद्येमाल जप्त
५१ किलो गांज्यासह १० लाख रुपयांचा मुद्येमाल जप्त

सपोनि महादेव गोमारे यांच्या फिर्यादीवरुन आरोपी विरुध्द पो स्टे मुरुड गुरनं 225/2020 कलम 20 एनडीपीएस कायदयाप्रमाणे गुन्हा नोद करुन आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे करत असून सदरची कारवाई लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर यांचे विशेष पथक, पोलीस ठाणे मुरुड येथील सपोनि महादेव गोमारे, पोलीस ठाणे गातेगाव येथील प्रभारी अधिकारी सपोनि श्री विलास नवले तसेच दुय्यम निरीक्षक श्री आर. जी.राठोड राज्य उत्पादन शुल्क लातूर आदींनी काम पाहिले.

About The Author

error: Content is protected !!