मारुती महाराज साखर कारखान्यास लातूर जिल्हा बँकेकडून कर्जाचे पुनर्गठन
लातूर : मांजरा परिवारातील असलेला औसा तालुक्यातील बेलकुंड येथील संत मारुती महाराज सहकारी साखर कारखाना अनेक वर्षापासून बंद होता मात्र गतवर्षी झालेल्या संचालक मंडळाच्या निवडनुकीत राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनात पालकमंत्री अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीत पुर्ण संचालक मंडळ निवडून आले होते निवडनुकीत प्रचारात शेतकरी सभासदास कारखाना सुरू करण्याचे ठोस आश्वासन पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले होते त्यानुसार कारखाना सुरू करण्यासाठी आवश्यक कारवाई सुरू करण्यात आली असुन हा साखर कारखाना लातूर जिल्हा बँकेच्या कर्जापोटी ताब्यात होता तो रितसर शासनाने थकहमी घेतल्याने जिल्हा बँकेच्या वतीने कारखान्याला कर्जाचे हप्ते परतफेड करण्यासाठी 9वर्षाची मुदत दिली असुन सुरवातीचे दोन वर्ष हप्ता भरण्यास मुभा दिली आहे त्यानुसार जिल्हा बँकेने प्रक्रीया पुर्ण करुण साखर कारखान्याचा ताबा मारुती महाराज साखर कारखान्याच्या संचालक मंडळाला दिला असुन त्याबद्दल साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या वतीने जिल्हा बँकेचे आभार व्यक्त केले आहे दरम्यान साखर कारखाना सुरू होण्यासाठी संचालक मंडळानी आवश्यक पावले उचलण्यास सुरवात केली आहे
संत मारुती महाराज सहकारी साखर कारखाना गेल्या सहा वर्षापासून बंद होता लोकनेते विलासराव देशमुख यांनी हा साखर कारखाना उभा केला असल्याने या भागात मांजरा परिवाराच्या साखर कारखाण्यास इथुन उस जात होता आज ही जात आहे हा साखर कारखाना सुरू व्हावा यासाठी या भागातील शेतकरी सभासद यानी माजी मंत्री दिलीपराव देशमुख,पालकमंत्री अमित देशमुख यांना साकडे घातल्याने त्यानी पँनल उभे केले सर्वच सर्व संचालक मंडळ निवडून आणले लोकानी विश्वास ठेवुन देशमुख परिवाराच्या ताब्यात साखर कारखाना दिला नेत्यांनी ठोस आश्वासन सुरू करण्याचे दिले आज त्या आश्वासनाची पुर्तेतेकडे वाटचाल सुरू आहे त्या दृष्टीने पावूल उचलले आहे देशमुख परिवार जेव्हा बोलतात ते करुण दाखवतात त्यामुळे लोकनेते विलासराव देशमुख,माजी मंत्री दिलीपराव देशमुख,पालकमंत्री अमित देशमुख,आमदार धिरज देशमुख याना मानणारा मोठा वर्ग या साखर कारखाना परिसरात आहे.त्यामुळे रितसर जिल्हा बँकेकडून ताबा मारुती महाराज साखर कारखाना संचालक मंडळाकडे देण्यात आला आहे
हा साखर कारखाना सुरू करण्यासाठी मदत केल्याबद्दल लातूर जिल्हा मध्यवर्ती सह्कारी बँकेचे मार्गदर्शक माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब,बँकेचे चेअरमन अँड श्रीपतराव काकडे, व्हाईस चेअरमन पृथ्विराज सिरसाठ,कार्यकारी संचालक हणमंत जाधव,सन्माननीय संचालक मंडळ यांचे मारुती महाराज साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव बाजुळगे,व्हाईस चेअरमन शामराव भोसले,विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्रीशैल्य उटगे ,प्रभारी कार्यकारी संचालक मोहन चव्हाण सर्व सन्माननीय संचालक मंडळ यानी आभार व्यक्त केले आहे.