अबिद शेख यांची वैद्यकीय अधिकारी म्हणून निवड

अबिद शेख यांची वैद्यकीय अधिकारी म्हणून निवड

औराद (भगवान जाधव) : निलंगा तालुक्यातील हलगरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे अबिद शेख यांची वैद्यकीय अधिकारी म्हणून निवड झाली आहे.

मुळचे औराद शहाजणीचे भूमिपुत्र असलेल्या अबिद शेख यांनी मुंबई येथील जेजे हॉस्पिटल येथे एम बी बी एस वैद्यकीय पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांची हलगरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल औराद येथील अर्जुन पाटील मित्र मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मित्र मंडळाचे अध्यक्ष अर्जुन पाटील, विदयासागर गाजुरे, इक्बाल मुल्ला, जावेद मुल्ला, मदन बोंडगे, प्रकाश बोंडगे, सय्यद शेख सर व राष्ट्रवादीचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author