लातूर सोडले तरी लातूकरांवरील प्रेम मात्र कायम राहणार!
लातूर (प्रतिनिधी) : लातूरचे आणि माझे ऋणानुबंध भावनिकदृष्ट्या दृढ झालेले आहेत. माजी प्रशासकीय बदली झालेली आहे. परंतु बदल नाही. त्यामुळे मी लातूर सोडले तरी लातूरकरांवरील प्रेम कायम राहणार आहे. असे भावनिक उद्गार लातूरचे माजी जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी जेएसपीएम लातूर व भाजपा युवा मोर्च्या यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऋणानुबंध सन्मान कर्र्तृत्वाचा या प्रकट मुलाखतीच्या कार्यक्रमात संवादप्रसंगी काढले.
प्रारंभी भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर, माजी जि.प.अध्यक्षा सौ.प्रतिभाताई पाटील कव्हेकर, युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर, जेएसपीएमचे समन्वयक संचालक निळकंठराव पवार यांच्याहस्ते शाल,तुळशीचे रोप, ग्रंथ व शिवरायांची प्रतिमा देवून सत्कार करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रात योगदान दिलेले विजय पोतदार, बालाजी जाधव, प्रतिक फुटाणे, अस्मिता गोरे, राहुल पाटील यांनाही ग्रंथभेट व तुळशीचे रोप देवून त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी प्रकट मुलाखतीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांची कौटुबिक परिस्थिती, प्राथमिक,माध्यमिक शिक्षण, तिकीट कलेक्टरची नोकरी, आंतरजातीय विवाह ते आय.ए.एस.अधिकारी पदापर्यंतचा प्रवास मुलाखतीच्या माध्यमातून उपस्थितासमोर मुलाखतीच्या माध्यमातून प्रकट केला. तसेच लातूरच्या तीन वर्ष सात महिणे 12 दिवसाच्या कालावधीत अतिक्रमणमुक्त शहर, नाट्यग्रहाचे कामकाज विभागीय स्टेडीयमचे काम तसेच लातूरचा पाणीप्रश्न कसा मार्गी लावला यावरही जी.श्रीकांत यांनी सविस्तर संवाद साधला.
विभागीय स्टेडीयमचे काम कोव्हिडमुळे थांबले
प्रकट मुलाखतीमध्ये जिल्हाधिकारी हे खेळाडू असल्यामुळे त्यांना कव्हा येथील विभागीय स्टेडीयमचे काम का थांबले?,असा प्रश्न युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी विचारताच जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी सदरील काम कोव्हिडमुळे थांबलेले आहे. याचे अध्यक्ष विभागीय आयुक्त आहेत. कोव्हिडनंतर ते काम सुरू होईल, असा खुलासाही त्यांनी यावेळी बोलताना केला.
आजी-माजी पालकमंत्री दोघेेही स्फुर्तीवान
लातूरच्या राजकीय वाटचालीबाबत अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी जी.श्रीकांंत सर यांना लातूरच्या आजी-माजी पालकमंत्र्यामध्ये स्फुर्तीवान पालमंत्री कोण असा प्रश्न विचारताच जी.श्रीकांत यांनी दोन्हीही पालकमंत्री स्फुर्तीवान आहेत. दुष्काळाच्या कालावधीत माजी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी चांगले काम केले. तर कोव्हिडच्या कालावधीत विद्यमान पालकमंत्री अमितभैय्या देशमुख यांनीही चांगली भूमिका बजावल्यामुळे कोरोणाशी लढा देण्यास लातूरकरांना यश आले.
वैक्सीनपर्यंत राहण्याची ईच्छा अपुरी
कोव्हिडच्या पार्श्वभूमिवर चांगले काम करूनही प्रशासकीय बदली झाली, असा प्रश्न विचारताच जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी डिसेंबर 2019 पासून कोरोना चायनामध्ये आला. जानेवारी मध्ये पहिला मिटींग आयुक्तांच्या उपस्थितीत घेण्यात आली. त्यानंतर लॉकडाऊनचे आवाहन, सोशल डिस्टंसिंगचे पालन, सॅनिटायझरचा वापर याबाबत फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आवाहन केले. आणि कोरोणा आटोक्यात आणण्यास यश मिळाले. परंतु कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी वैक्सीन वाटपाची ईच्छा मात्र अपुरी राहिली ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बदली होण अपेक्षीत होते.
बेटी बचाव, बेटी पढावचा बॅ्रंड अॅम्बेसेडर झालो
कुटुंबामध्ये एक मुलगी आणि एक मुलगा झालाकी पूर्ण फॅमिली होते. परंतु आपणाला दोनीही मुलीच झाल्या याबाबत काय वाटते. असा प्रश्न अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी विचारताच जी.श्रीकांत सर म्हणाले की, हे वास्तव आहे. पहिली मुलगी झाली. त्यानंतर मुलगा होईल, असे वाटत होते. पण मुलगी झाली. परंतु यामुळे माझा आनंद द्विगुनितच झाला. त्या मुलीचे जंगी स्वागतही झाले. आणि दोन्ही मुलीमुळे खर्या अर्थाने मी बेटी बचाव, बेटी पढावचा मी ब्रँन्ड अॅम्बेसेडर झालो, अशी भावनाही त्यांनी यावेळी प्रकट मुलाखतीत बोलताना व्यक्त केली.