सेल्फी विथ रांगोळी स्पर्धेचे निकाल जाहिर
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त नाविन्यपूर्ण उपक्रम
अहमदपूर (गोविंद काळे) : भारतीय संस्कृतीमध्ये रांगोळीला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक दिवसाला किंवा सणाला वेगवेगळ्या आकाराची रांगोळी काढण्याची प्रथा परंपरेने चालत आलेली आहे.सौंदर्याचा साक्षात्कार व मंगलाची सिद्धी हे रांगोळीचे उद्देश मानले जातात.संस्कृती व कला याची जपवणून व्हावी या उद्देशाने सृजन बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्य १७ सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून आँनलाईन ‘सेल्फी विथ रांगोळी’ स्पर्धेचे आयोजन करण्यात होते. या स्पर्धेचे निकाल उत्कृष्ट रंगवलीकार महादेव गोपाळे यांच्या हस्ते यूटूब लिंकच्या माध्यमातून घोषित करण्यात आला.
लाँकडाऊन काळात विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या स्पर्धेसाठी संधी उपलब्ध करुन देण्यासाठी सृजन संस्थेने पुढाकर घेऊन अनेक स्पर्धेचे आयोजन केले आहे. या सेल्फी विथ रांगोळी स्पर्धेचे निकाल लहान गटातून प्रथम-स्वरा रामदास जाधव, द्वितीय – श्रेया गुलाब जाधव, द्वितीय – श्वेता संदिप पिसाळ, तृतीय- वैष्णवी तुषार भोसले,तृतीय- अक्षरा संतोष जाधव तर मोठ्या गटातून प्रथम – वैष्णवी संजय सोनवणे, द्वितीय- वैष्णवी चंद्रकांत कोरे, द्वितीय -सानिका सुर्यकांत कोरे, तृतीय- ब्राम्ही सतीश पाटील, तृतीय- अनुष्का विजय शिंदे यांनी पारितोषिके पटकावली आहेत.दोन्ही गटातून द्वितीय व तृतीय पारितोषिक विभागून देण्यात आली आहेत.
सदरील स्पर्धा ही आँनलाईन पद्धतीने राबविण्यात आली होती.सर्व सहभागी विद्यार्थ्यांना आँनलाईन ई-प्रमाणपत्र व गुणवंत विद्यार्थ्यांना फोन पे द्वारे रोख रक्कम व गुणवत्ता प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. वरील स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गिनिज बुक आँफ वर्ल्ड रेकार्ड रंगवलीकार महादेव गोपाळे, किरण खमितकर, महादेव खळुरे, अविनाश धडे, दिपक जगताप, सलिम आतार, मल्लपा खळुरे, आदिनी परिश्रम घेतले.