महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाच्या वतीने उमेश खोसे यांचा सत्कार

महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाच्या वतीने उमेश खोसे यांचा सत्कार

अहमदपूर (गोविंद काळे) : एकाच वर्षात अगदी कमी वयात दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे गुरुजी ज्यांनी राष्ट्रीय स्तरावर उपक्रमशील शिक्षक म्हणून ओळख निर्माण केली आहे. असे उपक्रमशील शिक्षक उमेश खोसे यांचा महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ शाखा लातूरच्या वतीने जिल्हा अध्यक्ष महादेव खळुरे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

आपल्या सेवेत त्यांनी जि.प.प्रा.शाळा लमाण तांडा, बेळब व सध्याची शाळा जगदंबानगर,कडदोरा या दोन शाळेत अध्यापनाचे कार्य केले आहे. दोन्ही शाळेत विविध उपक्रम राबवून शाळेची गुणवत्ता वाढविले आहेत.एकूण १४ वर्षे सेवेत ग्रामीण भागातील मुलांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शिक्षण घेता यावे यासाठी ऑफलाईन ५१ अँप्सची निर्मिती करुन दिली. २०१८ चा राष्ट्रीय आय सी टी पुरस्कार. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२१ मराठवाडा रत्न पुरस्कार – २०२१ अशा पुरस्कारांनी सन्मानित झालेले उमेश खोसे यांनी मराठवाडा सह ग्रामीण भागातील शिक्षकांचे महत्व वाढवले आहेत.

महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाचे प्रदेश अध्यक्ष विनोद इंगोले,प्रदेश सरचिटणीस प्रल्हाद साळुंके, प्रदेश उपाध्यक्ष प्रल्हाद शिंदे यांनी भ्रमणध्वनीवरुन अभिनंदन केले. लातूर जिल्हातील कला शिक्षक शिवकुमार गुळवे,संतोष पारशेट्टे, जयप्रकाश हाराळे, तुकाराम देवकत्ते, पुरुषोत्तम काळे, संभाजी भोपे, लक्ष्मण गुडेवार, दिपक हालकंचे,हाणमंत हेळगीरे,बसवेश्वर थोटे, सतीश बैकरे, नागनाथ स्वामी, विवेकानंद मठपती, मोहन तेलंग, प्रदिप माने, जनार्धन फुले, संतोष डावळे, अमृत तिडके, राजकुमार पवार, दिलीप घोडके, महादेव शिरसाठ, सौ.रेखा जाधव, माधव वागलगावे, मारोती जाधव आदिनी अभिनंदन केले.

About The Author