बापुजी विद्यालय सावरगाव रोकडा येथे इंधन संवर्धन जनजागृती कार्यक्रम संपन्न
उर्जा अपव्यय रोखण्याची गरज – केदार खमितकर
अहमदपूर (गोविंद काळे) : सृजन बहूउद्देशीय सेवाभावी संस्था आणि पेट्रोलियम संरक्षण अनुसंधान संघ यांच्या संयुक्त विद्यमाने बापूजी विद्यालय सावरागाव रोकडा येथे गृहऊर्जा प्रबंधन कार्यक्रम आयोजित करण्यात आले. ऊर्जाबचत ही काळाची मागणी व गरज आहे. हे वास्तव कोणालाही नाकारता येणार नाही. त्याचा परिणाम आताच्या पिढीला व त्यापेक्षाही गंभीरपणे पुढच्या पिढीला भोगावे लागणार आहेत. असे प्रतिपादन एनर्जी आँडिटर केदार खमितकर यांनी केले. यावेळी मुख्याध्यापक पी.एन.डांगे यांची प्रमुख उपस्थिती होती. ऊर्जा बचत ही लहान-मोठे, स्त्री-पुरुष, घरगुती- व्यवसायिक अशी प्रत्येकाची जबाबदारी आहे असे सहभागी विद्यार्थीं – विद्यार्थींनी बरोबर सचिव यांनी संवाद साधला. भारत सरकारच्या ब्यूरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी (BEE) द्वारा प्रमाणित स्टार रेटिंगची उपकरणे वापरली तर फार मोठ्या प्रमाणांत विजेची बचत होते असल्याचे खमितकर म्हणाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन लक्ष्मण उदगीरे यांनी केले.कार्यक्रमाचे आभार राजकुमार घोटे यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप सक्षम प्रतिज्ञेने करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक पी.एन डांगे पर्यवेक्षक राजकुमार घोटे सह शिक्षक कार्यक्रमाची रुपरेषा व प्रास्ताविक श्री लक्ष्मण उदगीरे सर यांनी केले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कलाध्यापक श्री जयप्रकाश हराळे यांनी परिश्रम घेतले,तसेच सचिन सुडे संतोष गिरी, नितिन गढवे, अनिल भिंगोले, गजानन भिंगोले, सौ.निर्मला पंचगल्ले, सौ.अनिता नामेवार, गौरीशंकर लव्हराळे, अजमोद्दीन टेकर शिक्षकेत्तर कर्मचारी अनिल मुगावे, राम पवार, माधव वनाले, ओमप्रकाश सोलपूरे आदिनी परिश्रम घेतले.