जन्मदिवस निस्वार्थ योगा शिक्षिका सौ दीपा वानखेडेंचा

जन्मदिवस निस्वार्थ योगा शिक्षिका सौ दीपा वानखेडेंचा

वाशिम (राम जाधव) : जन्मदिवस म्हंटल की आंनदाने तो दिवस प्रत्येक झण साजरा करतात.आज जन्मदिवस एका योगा शिक्षकीचा आहे. त्या शिक्षिका म्हणजे सौ दीपा वानखेडे निशुल्क,मोफत योगा प्रशिक्षण देत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व केंद्र बंद झाल्याने योगा शिकणाऱ्या सर्व लहान मोठ्यांची तारांबळ उडाली होती. त्यातच सामाजिक बांधिलकी जपत पतंजली योग समितीच्या वाशिम जिल्हाध्यक्षा सौ दीपा वानखेडे यांनी मात्र पर्यायी वॉट्सअप्प च्या सोशल मीडिया द्वारे योगा करणारे सर्व नागरिक याना एकत्रित आणत ऑनलाईन प्रशिक्षण देणे सुरूच ठेवले.त्यांनी देशभरात नव्हे तर विदेशातही ऑनलाईनच्या (शोशल मीडिया) माध्यमातून प्रशिक्षण दिले आणि देत आहेत. कोरोनाच्या काळात तर सर्व जिम,व्यायाम करण्याचे सर्व खुले मैदान सुद्धा बंद झाले होते तर सर्व नागरीक घरातच राहून या योगा मार्फत रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी योगा लिंक ला जॉईन होऊन धडे घेत राहिलेत आणि घेत सुद्धा आहेत.कोरोना काळात योग करुन प्रतिकारशक्ती वाढविणे, आयुर्वेदाचा आधार घेऊन शरीराचे, इंद्रियाचे, मनाच्या सर्व प्रकारच्या रोग व्याधीपासून रक्षण होते.तसेच वातावरण, पर्यावरण शुध्दी करुन स्वच्छतेचा संदेश पोहोचविणे या अनुषंगाने वाशिम येथील पतंजली योग समितीच्या पुढाकाराने दीपा वानखडे यांनी उपक्रम सुरु केला आहे. तर त्यांच्या याच कार्याची दखल घेत बेटी बचाव फाउंडेशन मार्फत राष्ट्रीय भारत भूषण पुरस्कार देण्यात आला.तर 2019 मध्येव्हाईट स्पेस संस्था, पुणे यांच्याकडून नि:शुल्क योगसेवेसाठी तर 2020 मध्ये कवी डॉ. विठ्ठल वाघ यांच्या हस्ते ‘युथ आयकॉन पुरस्कार’ यांसह विविध सामाजिक संघटनांचे पुरस्कार मिळाले आहेत. विशेष म्हणजे आयुष मंत्रालय, भारत सरकारच्यावतीने घेण्यात आलेल्या जागतिक पातळीवरील योग शिक्षक आणि योग मूल्यांकन या परीक्षाही त्या उत्तीर्ण झाल्या आहेत. आशा प्रामाणिक,निस्वार्थ व्यक्तिमत्त्वास जन्मदिनी शुभेच्छा.असेच कार्य त्यांच्या हातून घडो व मानव जातील निरोगी राहण्यासाठी महत्वपूर्ण असलेल्या योगा प्रशिक्षण कार्य तुमच्या हातून यापुढेही घडो तसेच त्यांच्या कार्याची नागरिकांतून कौतुक व स्तुती होत आहे.

About The Author