चांदोरीत देव द्या देवपण घ्या – चांदोरी आपत्ती व्यवस्थापन समिती व सायखेडा पोलिस यांचा उपक्रम
चांदोरी ( रोहित टोंपे ) : निफाड तालुक्यातील गोदाकाठला शासन नियमांचे पालन करत पर्यावरण पूरक गणेश विसर्जन पार पडले. नद्या ,ओहळ ,बंधारे यात दरवर्षी मोठ्या प्रमाणत गणेश मूर्ती चे विसर्जन ,निर्माल्य मोठ्या प्रमाणत नदी मध्ये टाकले जाते या मुळे पाण्याचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते व याचा फटका जलचर प्राण्याना सुद्धा होतो.
ह्या बाबत गांभीर्याने दखल घेत चौथ्या तिसऱ्या वर्षी चांदोरी आपत्ती व्यवस्थापन समिती व सायखेडा पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने देव द्या देवपण घ्या हा उपक्रम राबविण्यात आला.
मूर्ती विसर्जन न करता ती दान करावी अशी संकल्पना तयार केली व तसेच निर्माल्य नदी मध्ये न टाकता ते जमा करून त्याचे सेंद्रिय खत तयार करतात.
देव द्या देवपण घ्या या उपक्रमाला चांदोरी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत १००% मूर्ती दान केले
सकाळी 8 वाजता या उपक्रमातला सुरवात झाली व गणेश मूर्ती व निर्माल्य नदी मध्ये न टाकता ते जमा करून या उपक्रमाला उत्फुर्त प्रतिसाद दिला.
तसेच या वेळी कोरोना विषाणू चे सावट असल्याने गोदकाठ ला काही गावात नदी काठी गर्दी होऊ नये म्हणून विशेष नियोजन करण्यात आले होते. तसेच नदी काठी गर्दी चे व गोदावरी नदी दुथडी भरून वाहत असल्याने गणपती विसर्जन साठी सर्व लहान मुले , महिला,वृद्ध ,तरुण मंडळी नदी काठी येत असता कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी व पोलिस कर्मचारी तैनात होते.
या वेळी आपत्ती व्यवस्थापन समितीचे
सागर गडाख , विलास गडाख , विलास गांगुर्डे , बाळू आंबेकर ,पुष्कर भन्साळी , वैभव जमधडे , किरण भुरकुडे , फकिरा धुळे , लक्ष्मण वाघ , पोलीस पाटील अनिल गडाख तसेच ,सायखेडा पोलीस ठाणे चे
सहाय्यक पोलीस निरीक्षक पी.वाय. कादरी ,
पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे, पोलीस कर्मचारी व आपत्ती व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते.