जीवनाला दिशा देणाऱ्या शिवरत्न पुरस्काराचे मोल्य व पावित्र्य जपले पाहिजे – ना.संजय बनसोडे राज्यमंत्री

जीवनाला दिशा देणाऱ्या शिवरत्न पुरस्काराचे मोल्य व पावित्र्य जपले पाहिजे - ना.संजय बनसोडे राज्यमंत्री

लातूर (प्रतिनिधी) : प्रत्येक वेक्तीच्या जीवनात कार्य पाहुन मान सन्मान व पुरस्कार मिळत असतो परंतु शिवदर्शन फाऊंडेशन लातूर व लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांच्या स्मृती दिनानिमीत दिला जाणारा व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा पुरस्कार आहे याचे एक वेगळेच महत्त्व व दर्जा प्राप्त आहे . पावित्र्य व मोल्य आपण सर्वांनी जपले पाहिजे मानाचा शिवरत्न पुरस्कार स्वीकारणार्य सर्व वेक्तीच्या जीवनात यामुळे योग्य दिशा व ऊर्जा मिळणार आहे असे मत राज्याचे राज्यमंत्री मा ना संजय बनसोडे पुरस्कार वितरण सोहळा प्रसंगी म्हणाले

कार्यक्रमाला अध्यक्ष हभप प्रशांत महाराज चव्हाण खानापुरकर उदघाटन माजी आ अॅड त्रंबक नाना भिसे महापौर विक्रांत गोजमगुडे जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील जेष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे राष्ट्रवादीचे प्रशांत पाटील लातूर मिशन वृत्तपत्राचे संपादक तथा शिवदर्शन फाऊंडेशनचे अध्यक्ष भारत जाधव हे मंचावर उपस्थित होते यावेळी बोलताना विलासराव देशमुख यांनी प्रत्येक घटकाला योग्य न्याय देण्याची भुमिका घेतली त्यांचे कार्य सर्वाना प्रेरणा देणारे आहे. अशा अष्टपैलू वेक्तीचा स्मृतिदिनानिमित्त शिवरत्न पुरस्कार दिला जातो हा आगळा वेगळा सोहळा आहे याचे नियोजन खुप चांगले केल्या मुळे सर्व संयोजकाचे अभिनंदन केले विविध विषयांवर राज्यमंत्री संजय बनसोडे यावेळी बोलले

समाजातल्या चौदा रत्नांचा शिवरत्न देऊन गौरव केल्याने त्यांची उंची वाढली
हभप प्रशात महाराज चव्हाण खानापुरकर

पुरस्कार दिल्याने त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडते सकारात्मक कार्याला आणखीन चांगले स्वरूप येते या पुरस्काराचे पवित्र आपण जपले पाहिजे कारण विलासराव देशमुख साहेब व छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा हा पुरस्कार आहे यावेळी चौदा रत्नाचा गौरव केल्याने त्यांची उंची नक्कीच वाढली आहे असे प्रशांत महाराज चव्हाण खानापुरकर म्हणाले

विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करणे ही खूप मोठी बाब आहे
माजी आ अॅड त्रंबक नाना भिसे

पुरस्कारामुळे वेक्तीचे खुप महत्व वाढते त्यांच्या कार्याला वेगळा आयाम प्राप्त होतो पुरस्काराला महत्व असते ते शेवटपर्यंत अबाधित ठेवले पाहिजे असे मत माजी आ अॅड त्र्यंबक नाना भिसे यांनी व्यक्त केले

काळाची पावले ओळखून वृत्तपत्र क्षेत्रात बदल आवश्यक
युवराज पाटील जिल्हा माहिती अधिकारी लातूर

वृत्तपत्र क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणावर काळानुसार बदल घडत आहेत पत्रकारांनी पत्रकारीता क्षेत्रात बदल केला पाहिजे सध्याची पत्रकारिता ही खूप वेगळी आहे या स्पर्धेत टिकायचे असेल तर सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्रकारिता करणे गरजेचे आहे असे अभ्यास पुर्ण मत मांडुन लातूर मिशन वृत्तपत्र व शिवदर्शन फाऊंडेशन चे कौतुक युवराज पाटील यांनी केले

पत्रकारांनी रोखठोक व निर्भीड लेखणीची वापर करावा
जेष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे
सध्याच्या काळात परखड व निर्भीड भुमिका मांडणारे वृत्तपत्र व पत्रकाराची भुमिका महत्वाची आहे एखादा विषयाला पत्रकारच न्याय देऊ शकतो त्यामुळे त्या लेखनीला धार असणे गरजेचे आहे सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे अभिनंदन जयप्रकाश दगडे यांनी केले

प्रशासनात व समाजात उत्कृष्ट कार्य करणार्यां वेक्तींचा गुणगौरव सोहळा
भारत जाधव अध्यक्ष शिवदर्शन फाऊंडेशन लातूर
दरवर्षी शिवरत्न पुरस्कार देऊन कर्तबगार व्यक्तींचा मान्यवरांच्या हास्ते गौरव केला जातो ही सन्मानाची परंपरा यापुढे अशीच चालू राहील माझ्या विनंतीला मान देऊन आलेल्या सर्व प्रमख मान्यवर व पुरस्कार प्राप्त वेक्तीचे मनःपूर्वक अभिनंदन करतो असे मत पत्रकार तथा शिवदर्शन फाऊंडेशन चे अध्यक्ष भारत जाधव यांनी मांडले

पुरस्कार प्राप्त सुर्यकांत सुडे (सरपंच हरंगुळ बु.), डॉ. लक्ष्मण देशमुख (जिल्हा शल्य चिकित्सक, लातूर), शाम गोडभरले (गटविकास अधिकारी पं.स., लातूर), अनिल कांबळे (जिल्हा जलसंधारण अधिकारी, लातूर), डॉ. जयपक्राश दरगड (प्राचार्य, दयानंद विज्ञान महाविद्यालय, लातूर), महादेव आसलकर (तंत्र अधिकारी, विभागीय कृषी सहसंचालक, लातूर), निळकंठ पवार (प्रशासकीय समन्वयक, जेएसपीएम संस्था, लातूर), उत्तम गोमसाळे (ग्रामसेवक, लातूर), शिवाजी हेडगे (मुख्याध्यापक, श्री केशवराज प्राथमिक विद्यालय, लातूर), दत्तात्रय शिंदे (तलाठी सज्जा, लातूर),संगम कोटलवार (संपादक, दै. सारथी समाचार), सर्फराज मणियार (अध्यक्ष, सहारा ग्रुप, लातूर), अमित तिकटे (डिजीटल मिडया, लातूर), तेजस धुमाळ (संगित कला क्षेत्र) या मान्यवरांना मानाचा शिवरत्न पुरस्कार देऊन प्रमुख पाहुण्याच्या उपस्थितीत गौरवण्यात आले.
यावेळी सुत्रसंचालन बालाजी कांबळे यांनी केले तर आभार प्रा विनोद चव्हाण यांनी मानले या कार्यक्रमाला मान्यवर व पुरस्कारार्थी सह परमेश्वर घुटे, सुरेश काचबावार, तानाजी घुटे, कैलास साळुंके, श्रीराम गायकवाड, अजित दुटाळ, दयानंद माने, शंकर जाधव, अजित काळदाते, बालाजी वाघमारे, गोविंद जगताप, कुमार भालेराव, दिपक बोराडे, तुकाराम जोगदंड, अनिल शेळके, संतोष मगर, लखन सावंत, श्रॄषी मोरे, अजित माने, दिपक शिंदे, विष्णू शिंदे, महेश राठोड व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!