जिल्हयात साथींचे आजार पसरले, नागरीकांचे आरोग्य धोक्यात

जिल्हयात साथींचे आजार पसरले, नागरीकांचे आरोग्य धोक्यात

यवतमाळ (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील प्रत्येक नगर परिषद, नगर पंचायतमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे अख्ख्या जिल्ह्यात मेंदूज्वर, डेंग्यू, मलेरिया सारख्या आजाराचे हजारो रुग्ण उपचार घेत आहे. या आजारावर प्रशासन नियंत्रण मिळवू शकत नसल्याने सर्व खाजगी रुग्णालयात तसेच सरकारी रुग्णालयात हजारो रुग्ण येत आहेत. त्यामुळे या संदर्भात मोठया प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्याने शेती स्वावलंबन मिशन चे अध्यक्ष किशोर तिवारी हे दिनांक 20 सप्टेंबर रोजी यवतमाळ जिल्हयाचा दौरा करुन अस्वच्छतेची पाहणी करणार आहे.

डेंग्यू व मलेरिया रोखण्यासाठी कोणतीही मोहीम मागील दोन महिन्यापासून सुरू करण्यात आली नाही. बहुतांश नगरपरिषद नगर पंचायतमध्ये कचरा व सफाईचे कंत्राट मुख्याधिकारी व लोकप्रतिनिधी चालवत आहे. कचरा गोळा करण्यात व साफ करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा व व्यवस्थापन मुळीच नाही. सर्व डॉन लोक नगरपरिषद, नगर पंचायतमध्ये राज करीत असून खाबुगिरीने कळस गाठला आहे. निरापराथ गरीब जनता मात्र खाबुगिरीमुळे मरणयातना सहन करत आहे. निवडणुकीत मतदान १००० रुपयात विकले गेले नसते तर आज दवाखान्यात १ लाख रुपये लागले नसते. आता मशाली पेटविण्याचा निर्धार करा व चोर राजकीय नेते व भ्रष्ट अधिकाऱ्यांचे जुलमाचे राज्य संपवा असे आवाहन किशोर तिवारी यांनी केले आहे. दरम्यान किशोर तिवारी यांचा २० सप्टेंबरला यवतमाळ जिल्ह्यातील घाणीचे साम्राज्य व डेंग्यूच्या साथीचा पाहणीदौरा दौरा कार्यक्रम आयोजित केला आहे. सकाळी ११ वाजता पांढरकवडा वरून घाटंजी कडे रवाना . दुपारी १२ वाजता मुख्याधिकारी नगर परिषद घाटंजी यांच्यासोबत घाटंजी शहरातील घाणीचे साम्राज्याची पाहणी व कचरा विल्हेवाट यार्ड ची पाहणी. दुपारी १ वाजता मुख्याधिकारी नगर परिषद आर्णी यांच्यासोबत आर्णी शहरातील घाणीचे साम्राज्याची पाहणी व कचरा विल्हेवाट यार्ड ची पाहणी. दुपारी २ वाजता यवतमाळ नगराध्यक्ष व मुख्याधिकारी नगर परिषद यवतमाळ यांच्या सोबत यवतमाळ शहरातील घाणीचे साम्राज्याची पाहणी व कचरा विल्हेवाट यार्ड ची पाहणी . संध्याकाळी ५ वाजता जिल्ह्याधिकारी यवतमाळ यांच्यासोबत आढावा बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत यवतमाळ जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद व नगर पंचायत डेंगू मलेरियाची रुग्णांची संख्या व रोखण्यासाठी केलेली उपाययोजना स्वछता व आरोग्य डेंगू मेलेरिया साथ रोखण्याकरिता 14 वित्त आयोग निधी अंतर्गत कचऱ्याची विल्हेवाट लावण्याकरिता देण्यात आलेल्या कंत्राटाचा निधी मूळ कंत्राटदाराचे नाव व सध्या जे लोकप्रतिनिधी व अधिकारी चालवीत आहेत त्यांची नावे याची माहिती घेण्यात येणार आहे.

विषय २ – पदाधिकारी मुख्य अधिकारी यांच्या संगनमताने निविदा प्रक्रिया राबविल्या जाते आणि त्याचा कंत्राट नगर परिषदेच्या सदस्याचा भागीदार असतो अशा सर्व कामांची यादी व शहरांमध्ये स्वच्छ पाणीपुरवठा करण्यासाठी व त्यासाठी वार्षिक 50 लाख रुपये खर्च केला जातो त्याकरिता नफा फंडातून निविदा मागविल्या जाते त्यामध्ये सदस्याला सदर निविदा मॅनेज करून काम दिल्या जाते . अशा सर्व नगरपरिषद व नगर पंचायत लोकप्रतिनिधींची व त्यांच्यावर अपात्र घोषित करण्यासाठी कारवाई विषय ३- सर्व नगरपरिषद व नगर पंचायत मध्ये कंत्राट अपुर्ण असल्यामुळे वा कचरा तसेच डेंगू मलेरियाची रुग्णांची संख्या व रोखण्यासाठी केलेली उपाययोजना स्वछता व आरोग्य डेंगू मलेरिया साथ रोखण्याकरिता 14 वित्त आयोग निधी अंतर्गत कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात अपशय आल्याने ज्या निरपराध लोकांचे व रुग्णांचे प्राण गेले तसेच खाजगी रुग्णालयात लाखो रुपये खर्च झाले त्यांना नुकसान भरपाई देण्याच्या प्रस्तावावर चर्चा. विषय ४-सर्व नगरपरिषद व नगर पंचायत मध्ये डेंगू मलेरियाची साथ आढळून येऊ नये याकरिता लाखो रुपये कीटक नाशक फवारणी द्वारे किंवा फॉगिंग मशीन डास प्रतिबंधक उपाययोजना राबविण्यासाठी झालेला खर्च यावर चर्चा विषय ५- सर्व नगरपरिषद व नगर पंचायत मध्ये कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांच्या उत्पन्नाची आयकर विभागामार्फत चौकशी. या आढावा बैठकीला नगर प्रशासन सचिव महेश पाठक व नगर प्रशासन आयुक्त आभासी पद्धतीने उपस्थित राहतील व सर्व नगरपरिषद व नगर पंचायतचे मुख्याधिकारी उपस्थित राहतील याची जबाबदारी जिल्ह्याधिकारी यवतमाळ निश्चित करतील अशा सुचना देण्यात आल्या आहे.

About The Author