महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनची परळी तालुका कार्यकारणी जाहीर

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनची परळी तालुका कार्यकारणी जाहीर

अध्यक्षपदी उत्तम मुंडे तर उपाध्यक्षपदी अजय बळवंत यांची निवड

उपसभापती जानिमियाँ कुरेशी यांच्या हस्ते सत्कार

परळी वैजनाथ (गोविंद काळे) : राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या परळी तालुका अध्यक्षपदी उत्तम मुंडे तर उपाध्यक्षपदी अजय बळवंत यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. दरम्यान निवडीनंतर पंचायत समितीचे उपसभापती जानिमियाँ कुरेशी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन नागपूर जिल्हा शाखा बीडची जिल्हास्तरीय बैठक ज्येष्ठ मार्गदर्शक मा.राजेंद्र गर्जे, मा.जयलाल राजपुत, मा.सुनील घोडके, मा.परशुराम अर्सुळ, मा.अनंत खेडकर, मा.भागवत थापडे, मा.प्रवीण येवले, मा.दयानंद सरपते आदी मान्यवराच्या उपस्थितीत बैठकीत जिल्हा कार्यकारिणी जाहीर नुकतीच आली आहे. तालुकास्तरीय कार्यकारणी मध्ये परळी तालुका अध्यक्षपदी उत्तम मुंडे,सचिवपदी प्रविण रोडे, उपाध्यक्षपदी बळवंत अजय, कार्याध्यक्षपदी अंगद देवकते, सचिवपदी श्रीराम शेरेकर, कोषाध्यक्षपदी जगन्नाथ कराड यांची निवड करण्यात आली आहे. दरम्यान नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष उत्तम मुंडे व अजय बळवंत म्हणाले की, निवड झाल्याबद्दल जिल्हाध्यक्ष व सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानून कर्मचाऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन सदैव तत्पर राहणार आहे असे म्हणाले.सर्व कर्मचाराचा सुख दुःखा मध्ये संघटनां नेहमी कर्मचार्‍यांच्या पाठीशी राहील. यानिवडीनंतर पंचायत समितीचे उपसभापती जानिमियाँ कुरेशी यांनी तालुका कार्यकारणीची सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच पंचायत समितीचे सभापती बालाजी मुंडे, गटविकास अधिकारी संजय केंद्रे व सर्वांनी अभिनंदन केले आहे.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!