अतिवृष्टीने उस्मानाबाद जिल्ह्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

अतिवृष्टीने उस्मानाबाद जिल्ह्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

उस्मानाबाद (प्रतीनिधी) : मागील दोन दिवसापासून उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सर्वदूर पाऊस होत आहे. सध्या सोयाबीनची काढणी चालू झालेली आहे काही शेतकऱ्यांनी सोयाबीन काढून गोळा न करता शेतात वाळवण्यासाठी तसेच ठेवलेले आहे .दोन दिवसात झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी काही भागात ढगफुटी काही भागात मुसळधार पाऊस झाल्याने सोयाबीन मध्ये पाणी साचलेले असून सोयाबीन व इतर पिके जलमय झालेली आहेत सदरचे सोयाबीन भिजले असल्यास ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन चा विमा उतरविला आहे त्या शेतकऱ्यांना नुकसान झाले असल्यास सोयाबीन काढणी अगोदर व काढणीपश्‍चात नुकसान भरपाई या सदराखाली पिक विमा मिळू शकतो यासाठी पीक विम्यासाठी सोयाबीन अधिसूचित क्षेत्रातील शेतात सोयाबीन कापणी करून सुकवण्यासाठी पसरून ठेवलेल्या ठिकाणी कापणीपासून 14 दिवसात गारपीट, चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे पडलेला पाऊस व अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून नुकसानीस ग्राह्य धरता येतात. यासाठी शेतकऱ्यांनी सदरची घटना घडल्यापासून 72 तासाच्या आत याबाबतची सूचना विमा कंपनी व कृषी विभागास देणे बंधनकारक आहे. यामध्ये नुकसान काळविताना सर्वे नंबर व नुकसानग्रस्त क्षेत्र तपशील कळवणे ही बंधनकारक आहे.प्राप्त झालेल्या सुचनेनंतर संयुक्त समिती शेतकऱ्याच्या नुकसान झालेल्या क्षेत्राची पहाणी करेल या मध्ये विमा कंपनी प्रतिनिधी, कृषि अधिकारी व संबंधित शेतकरी यांचा समावेश असेल, पहाणीनंतर नुकसानीचा अहवाल 10 दिवसात सादर करण्यात येईल. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे अशा शेतकऱ्यांनी गूगल प्ले स्टोअर वरून crop insurance किंवा विमा कंपनीचे Farmmitra हे ॲप डाऊनलोड करून त्यामध्ये आपल्या नुकसानीची माहिती द्यावी किंवा 18002095959 या टोल फ्री क्रमांकावर किंवा कृषि विभागाच्या कार्यालयात अर्ज करून कळवावी. असे आव्हान कृषी विभाग उस्मानाबाद यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

About The Author