लातूर जिल्हा बँक पिक कर्जासाठी शेतकऱ्यांना ५ लाख रुपयांपर्यंत शून्य टक्के दराने कर्ज देणार

लातूर जिल्हा बँक पिक कर्जासाठी शेतकऱ्यांना ५ लाख रुपयांपर्यंत शून्य टक्के दराने कर्ज देणार

जिल्हा बँकेच्या ३८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची घोषणा

लातूर (प्रतिनिधी) : राज्यातील लोकनेते यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक, विलासराव देशमुख यांचे जे स्वप्न होते ग्रामीण भागातील लोकांना आर्थिक विकास झाला पाहिजे ते स्वप्न आज खऱ्या अर्थाने पुर्ण झाल्याचे दिसत असून गेल्या ३o वर्षात लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न खऱ्या अर्थाने केले आहेत त्यामूळेच आज जिह्यातील सहकारी सोसायटी कोटी रुपयांच्या झाल्या असून कुठल्याही कामासाठी शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीला जिल्हा बँक धावून येईल पिक कर्ज ३ लाख रुपये शून्य टक्के दराने देत होती आता यापुढे पाच लाख रुपयांपर्यंत शून्य दराने देणारं असल्याची घोषणा राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी केली आहे त्यामूळे राज्यात नव्हे तर देशात पाच लाख रुपयांपर्यंत शून्य दराने कर्ज देणारी लातूर जिल्हा बँक पहिली ठरली आहे ते लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ३८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभा आँनलाईन द्वारे गुरुवारी मुख्यालयात घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे चेअरमन अँड श्रीपतराव काकडे हे होते

पुढे बोलताना दिलीपराव देशमुख म्हणाले की जिल्हा बँक नेहमी पारदर्शक कारभार करीत सामाजिक बांधिलकी म्हणून जपण्याचे काम केले आहे कोविड काळात राज्य सरकारच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १ कोटी रुपये मदत केली बँक नफ्यात चालवत असताना बँकेच्या कर्मचारी अधिकारी याना दिवाळी बोनस म्हणून २२ टक्के व Kovid काळात अधिक काम केल्याने त्यांना बोनस व्यतिरिक्त एक महिन्याचा जादा पगार देण्याची घोषणा केली आहे त्याचबरोबर गट्सचिव यांनाही २२ टक्के बोनस जाहीर केला असून बँक दुष्काळ, कोवि ड आपत्कालीन काळात सुधा १oo टक्के वसुली करून एन पी ए सुद्धा निरंक ठेवण्यात बँकेचे अधिकारी कर्मचारी, गटसचिव यांचा मोठा सहभाग आहे त्यामुळं त्यांचेही कौतुक केले

लवकरच मोबाईल व्हॅन द्वारे कोअर बँकिंग सेवा तालुक्यात देणार

सध्या जिल्ह्यात बँकेच्या वतीने एटीम सेवा बँकिंग सेवा १५ ठिकाणीं सुरू असून लवकरच तालुक्यात व्हॅन बँकिंग सेवा देणार असल्याचे मत व्यक्त करून लोकांना कमी वेळात अधिक सेवा देण्याचा प्रयत्न करतोय शेतकरी शेतमजूर याना त्रास होऊ नये यासाठी लवकरच हि सेवा देणार असल्याचे दिलीपराव देशमुख यांनी सांगितले

जिल्हा बँक जपली पाहिजे

यावेळी बोलताना दिलीपराव देशमुख यांनी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही ग्रामीण भागातील लोकांची मातृत्व संस्था उभी राहिली आहे लाखो लोकांचें संसार शेतीवर अवलंबून असतात साखर कारखाने व जिल्हा बँक यावर लाखो लोक उभे आहेत त्यामूळे पुढील काळात सुधा पक्षीय राजकारण बाजूला ठेवून जिल्हा बँकेत समाजाच्या आर्थिक विकासाच्या प्रगतीसाठी यापुढें आपण राजकारण करू असा विश्वास व्यक्त केला सभासदांनी यावेळी सर्व विषयाना टाळ्यांच्या गजरात मान्यता दिली.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज शिरसाठ, राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, विलास साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रवींद्र काळे मारुती महाराज साखर कारखान्याचे चेअरमन गणपत बाजूळगे, संचालक अशोकराव पाटील निलंगेकर एस आर देशमुख, नाथसिंह देशमुख,संभाजी सुळ, भगवानराव पाटील विजय नगरकर, अँड प्रमोद जाधव व्यंकट राव बिरादार, सुधाकर रुकमे, यशवंतराव पाटील संजय बोरा, संचालिका सौ शिवकन्या पिंपळे सौ स्वयं प्रभा पाटील, कार्यकारी संचालक हणमंत जाधव, आँनलाईन द्वारे मुंबई येथून संचालक आमदार बाबासाहेब पाटील, चाकुर येथून एन आर पाटील, संभाजी रेड्डी, हरीराम कुलकर्णी, अशोक गोविंद पुरकर, अँड श्रीरंग दाताल, सौ मीनाताई सूर्यवंशी, बँकेचं सरव्यवस्थापक सी एन उगी ले, सरव्यवस्थापक तानाजी जाधव, विविध खाते प्रमूख अधिकारी कर्मचारी उपस्थित होते सूत्रसंचलन प्रा. सचिन सूर्यवंशी यांनी केले तर आभार प्रदर्शन पृथ्वीराज शिरसाठ यांनी मांडले

सभेचे वाचन कार्यकारी संचालक हणमंत जाधव यांनी केले विविध विषयाना सर्वसाधारण सभेत एक मताने मान्यता देण्यात आली तर अध्यक्षीय भाषणात बँकेचे चेअरमन अँड श्रीपतराव काकडे यांनी गेल्या सात वर्षांत बँकेने ठेवी वाढवून लोकांस अधिक चांगली से वा देण्याचा प्रयत्न केला असून यापुढेही बँक शेतकऱ्यांना सहजपणे कोअर बँकिंग सेवा देण्याचा प्रयत्न करेन असा विश्वास व्यक्त केला

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!