अहमदपूर रोटरी क्लबच्या वतीने नेशन बिल्डर अवार्ड

अहमदपूर रोटरी क्लबच्या वतीने नेशन बिल्डर अवार्ड

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील उपक्रमशील व तंत्रस्नेही 26 शिक्षकांना रोटरी क्लब अहमदपूर च्या वतीने संस्कृती गार्डन येथे आयसीटी व राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक उमेश खोसे व तालुकाचे गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे यांच्या हस्ते गुणवंत शिक्षकांना सन 2021-22 चा नेशन बिल्डर अवार्ड देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी ढोकाडे यांनी रोटरी क्लबचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय आहे.आपल्या मनोगतातून व्यक्त केले तर खोसे यांनी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केंद्र बिंदू समजून तंत्रज्ञान व बोली भाषेची सांगड घालून दिल्यास विद्यार्थ्यांमध्ये अमुलाग्र बदल घडवून येतो. लाँकडाऊन काळात अनेक शिक्षकांनी अध्यापन विविध तंत्रज्ञान चा वापर करुन आँनलाईन व आँफलाईन पद्धतीने अध्यापन करण्याचे पवित्र कार्य केले आहेत मनोगतातून व्यक्त केले. तालुक्यातील वाघंबर गंपले, शिला आकनगिरे, नामदेव कलमे, रहिमुन्निसा शेख,पुष्पलता शिंदे,चंद्रकांत मिरजगावे, बालाजी फुलमंटे, प्रकाश कज्जेवाड, प्रतिभा शिरुरकर, महेरबानु सय्यद, सुशेन पाटील, सुरेखा शेंडगे, रफीक शेख, ज्योती क्षिरसागर, रंजना भोसले, मनोज कदम, रामदास बिरादार,सुर्यकांत बोईनवाड, गणेश मुसळे, सतिश साबणे, सिमा मुळे, संतोष सुर्यवंशी, संतोष मुंढे, लईक शेख, सरस्वती देवकत्ते, स्नेहा तोडकर आदिना नेशन बिल्डर अवार्डने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन माने यांनी,प्रास्तविक सचिन करकनाळे, प्रमुख पाहुण्याची ओळख कपिल बिरादार तर आभार राहूल घाटोळ यांनी मानले. सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोटरीचे अध्यक्ष सचिन करकनाळे, सचिव राहूल घाटोळ,प्रोजेक्ट चेअरमन ज्ञानोबा भोसले, धनंजय कोत्तावार, भरत इगे, गोपाळ पटेल, मोहिब कादरी, आशिष हेंगणे, आदिनी परिश्रम घेतले.

About The Author