झरी ता.चाकूर येथील अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश..!
चाकुर (गोविंद काळे) : येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पवनसूत मिल्ट्री अकॅडमी, मौजे झरी ता. चाकूर येथे आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष बाबासाहेबजी पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश व बूथ मेळावा संपन्न झाला. पवनसूत मिल्ट्री अकॅडमी संचालक देविदास (बाळू) मुरकुटेजी यांच्यासह झरी (बु) येथील अनेक युवक, कार्यकर्त्यांनी आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आमदार तथा जिल्हाध्यक्ष बाबासाहेबजी पाटील यांच्या भक्कम नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादीत प्रवेश केला. मतदार संघातील विकास कामासोबतच पक्षाच्या संघटनात्मक बांधणी आणि पक्षवाढीवर नेहमीच प्रामुख्याने भर दिला आहे. याच कार्यावर विश्वास ठेवत अनेकांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यासर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन साहेबांनी केले. आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पुढील आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पक्षाचा अधिकाधिक जागा जिंकण्याचा मानस आहे.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जि.प.सदस्य दयानंदराव सुरवसे, तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे, माजी उपसभापती पद्माकर पाटील, बालाजी दादा सूर्यवंशी, माजी सभापती आर.डी.तेलंगजी, माजी नगराध्यक्ष मिलिंदराव महालिंगे, शहराध्यक्ष गणेशराव फुलारी, उपसभापती तुकाराम पाटील, अशोकराव कर्डीले, युवक जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम जाधव, तालुका उपाध्यक्ष आबा कवठे, युवक तालुकाध्यक्ष राहुल सुरवसे, महाळंग्रा उपसरपंच हेमंत पाटील, डॉक्टर सेल तालुकाध्यक्ष सी.टी.कांबळे, प्रवक्ते मधुकरराव कांबळे, अनिलराव वाडकर, किसान सेल तालुकाध्यक्ष रामदास घुमे, प्रा.यादव कर्डीले, नितीन पाटील, बाळासाहेब पाटील झरीकरजी, धुमाळ दाजी, युवक कार्याध्यक्ष विवेक शिंदे, संदिप शेटे, बिलाल पठाण, सचिन तोरेजी, समाधान जाधव, दत्ता आलामा, विष्णुकांत खेर्डे, झरी (खु) सरपंच युवराज सूर्यवंशी पाटील, व्यंकटराव जांभळदरे, जढाळा सरपंच राम सारोळे, तुकाराम पाटील झरीकर, मधुकर कर्डीले, शरदराव जाधव, प्रतीक केदार, सुभाष घोडके, पांडुरंग धडे, माधवराव वाकळे, तुकाराम केंद्रेजी, प्रकाश कामाळे, लालासाहेब शिंदे, विठ्ठल उदगिरे, वैश्यपन कार्डिले, विश्वांभर पाटील, ऍड.धनराज सूर्यवंशी, माधवराव पुणेजी, बाळू कासले, सुनील सूर्यवंशीजी, बशीर शेखजी, मगदूम शेखजी, ऍड.सुधीर सोनवणे, सत्यवान होळे, पद्माकर मुरकुटे, नितीन शिंदेजी, कासीम पटेल, बळीराम नागरगोजे, दगडो जाधव मंगेश गोसावी, चंद्रमनी सिरसाट, प्रा.मारोती बुद्रुक पाटील, दिलीपराव पाटील, बबनराव गव्हाणे, पराप्पा शिंदे, आश्विन शिंदे, झिया शेख, रामदास सुरवसे, लव्हू सुरवसे, नवनाथ चंद्रपाटले, शैलेश जाधवजी, मुन्ना पाटीलजी, अमोल सूर्यवंशी, गणेश सूर्यवंशीजी आदींची उपस्थिती होती.