चाकूर येथे आ. बाबासाहेब पाटील यांनी घेतली आढावा बैठक घेतली..!

चाकूर येथे आ. बाबासाहेब पाटील यांनी घेतली आढावा बैठक घेतली..!

चाकूर (गोविंद काळे) : पंचायत समिती चाकूर येथे गटविकास अधिकारी, ग्रामसेवक यांची आमदार बाबासाहेब पाटील यांनी बैठक घेऊन कामाचा आढावा घेतला. तसेच कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणा सज्ज ठेवा. तसेच ग्रामसेवकांनी लसीकरणाबाबत गावागावात जनजागृती करावी अधिकाधिक लसीकरण करून घेण्याच्या सूचना केल्या. त्याचबरोबर तालुक्यातील रस्ते मजबुतीकरण, मातीकाम करणे अश्या सूचना बैठकीत केल्या.

या बैठकीसाठी तहसीलदार शिवानंद बिडवे, तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे, गटविकास अधिकारी वैजनाथ लोखंडे, उपसभापती सज्जन लोणावळे, काँग्रेस तालुकाध्यक्ष विलासराव पाटील चाकूरकर, बालाजी दादा सूर्यवंशी, राधाकिशन तेलंग यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!