पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून हेक्टरी 50 हजाराची मदत जाहीर करा
माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर
जननायक संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बाबासाहेब कोरे
तर लातूर जिल्हाध्यक्षपदी सुर्यकांतराव शेळके यांची निवड
लातूर (प्रतिनिधी) : आठवडाभर झालेल्या पावसामुळे नदीकाठच्या गावातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून हेक्टरी 50 हजाराची मदत जाहीर करा अन्यथा शेतकर्यांच्या प्रश्नासाठी आंदोलन उभारावे लागेल. असा इशारा जननायक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी जिल्हा प्रशासनाला दिला. यावेळी ते जननायक संघटनेच्या मजगे नगर येथील कैलास निवासस्थानी झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत बोलत होते.
यावेळी जननायक संघटनेची राज्यस्तरीय कार्यकारीणीही जाहीर करण्यात आली.जननायक संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बाबासाहेब कोरे तर लातूर जिल्हाध्यक्षपदी सुर्यकांतराव शेळके यांची निवड करण्यात आली. त्यांची ही निवड जननायक संघटनेेचे संस्थापक अध्यक्ष माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय बैठकीत एकमताने करण्यात आली.
यावेळी या बैठकीमध्ये लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघाच्या अध्यक्षपदी बाबासाहेब देशमुख तर लातूर तालुका अध्यक्षपदी सारसा येथील बब्रुवान पवार यांची निवड करण्यात आली. लातूर शहर विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदी माजी नगरसेवक जमिलभाई मिस्त्री यांची निवड करण्यात आली. तसेच लातूर शहराध्यपदी राधेशाम पारीख यांची निवड करण्यात आली. तसेच रेणापूर तालुकाध्यक्षपदी प्रतापराव शिंदे यांची तर कार्याध्यक्ष पदी लक्ष्मणराव यादव यांची निवड करण्यात आली.
यावेळी या राज्यस्तरीय बैठकीला प्रा.डॉ.सतीश यादव, आप्पासाहेब पाटील, भूजंगराव पाटील, मंजूरखाँ पठाण, राजपाल पाटील, शिरीष गांढले, राजेभाऊ मुळे, वैजनाथ जाधव, महादेव गायकवाड, ज्ञानेश्वर मोरे, जाजू शेठ, सुभाष सोनवणे, तुकाराम पवार, उध्दव जाधव, श्रीकांत झाडके, ललीत पाटील, बिभीषण शिंदे यांच्यासह जननायक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
ऊस उत्पादक शेतकर्यांच्या हक्कासाठी कायदेशीर लढाई लढू
यावेळी या बैठकीमध्ये बोलताना जननायक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर बोलताना म्हणाले की, गावोगावी नदी खोलीकरणाच्या कामासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा, जिल्हाप्रशासनाने गुंठेवारी पध्दत रद्द करून परंपरागत रजिस्ट्रीची पध्दत सुरू करावी, महाविकास आघाडी सरकारने जी कर्जमाफी केली. यामध्ये ज्या शेतकर्यांनी वेळेवर कर्जाचे हप्ते भरले आहेत अशा शेतकर्यांना 50 हजार रूपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचे जाहीर केले होते त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी. विम्याच्या संदर्भातील नवीन निकष लागू केलेले आहेत ते तात्काळ रद्द करण्यात यावेत. याबरोबरच राज्यातील सर्व साखर कारखान्यांनी एफ.आर.पी. प्रमाणे ऊसाला भाव द्यावा. अन्यथा शेतकर्यांच्या हक्कासाठी कायदेशीर लढाई लढण्यात येईल. असा विश्वासही त्यांनी उपस्थित पदाधिकार्यांना दिला.