केंद्रेवाडी ग्रामपंचायतीकडून एक घर तीन वृक्षांचे वाटप
किनगाव (गोविंद काळे) : अहमदपूर तालुक्यातील केंद्रेवाडी ग्रा.पं. ने गावात व इतत्र रिकाम्या जागेवर गावकऱ्याच्या श्रमदानातून ५ते ७ फुट उंचीचे ३२००वृक्षाची लागवड केली आहे. या नाविण्यपुर्वक उपक्रमामुळे ग्रा पं . ला अनेक पुरस्कार प्राप्त आहेत. जि प.सदस्य तथा वृक्षमित्र अशोकराव केंद्रे, पं.स. माजी सभापती आयोध्याताई अशोकराव केंद्रे व श्री साई गणेश मिलिट्री फाउंडेशन चे अनिरुद्ध केंद्रे सामाजिक कार्यकर्ते तथा राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक माधव केंद्रे ग्रामपंचायत सदस्य इंद्रायणीबाई केंद्रे पुष्पा केंद्रे, बाळू केंद्रे, भानुदास केंद्रे तुकाराम केंद्रे यांनी अहमदपूर तालुक्यात ५२ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे.
यातील पहिला टप्पा एक महिण्यापुर्वी स्वतःच्या गावात म्हणजे केंद्रेवाडी मध्ये ३२०० वृक्ष लागवडीचा पुर्ण केला आहे . यात त्यांनी केंद्रेवाडीत एक घर तीन वृक्षांचे वाटप केले दिनांक 21/09/2021 वार मंगळवार रोजी *एक घर तीन वृक्ष (केशर आंबा , चिकू, जांब ) वाटप केले आहेत हे वाटप वासुदेव नाना काळे (प्रदेश अध्यक्ष भा .ज.पा. किसान मोर्चा) अशोक काका केंद्रे (जि.प सदस्य लातूर), मकरंदजी कोरडे (सरचिटणीस किसान मोर्चा भा .ज. पा.), सुधाकरजी भोयर (उपाध्यक्ष किसान मोर्चा भा.ज.पा.) अनिल श्रीरंग केंद्रे( सचिव किसान मोर्चा भा .ज .पा.) यांच्या हस्ते झाले यावेळी मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होता या गावकऱ्यांना 600 वृक्षांचे वाटप करण्यात आले हे सर्व वृक्ष गावाच्या हद्दीत लावण्यात आली आहेत कारण केंद्रेवाडी हे गाव ऑक्सीजन हब बनवण्याचा सौ . अयोध्याताई व श्री अशोक काका व सर्व गावकऱ्यांचा मानस आहे.