महात्मा फुले महाविद्यालयात एन .एस.एस. दिन साजरा
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने एन.एस.एस. दिनाचे व भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून एन.एस.एस. दिन साजरा करण्यात आला. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, एन.एस.एस. दिनाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते तर एन.एस.एस.चे माजी कार्यक्रमाधिकारी तथा उपप्राचार्य डॉ.डी.डी. चौधरी व माजी कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. अनिल मुंढे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त उपप्राचार्य डॉ.डी.डी. चौधरी यांनी तर एन.एस.एस. दिनानिमित्त प्रा.डॉ. अनिल मुंढे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन एन.एस.एस. चे कार्यक्रमाधिकारी डॉ. पी.डी. चिलगर यांनी केले तर आभार माजी कार्यक्रमाधिकारी तथा उपप्राचार्य डॉ. डी.डी. चौधरी यांनी मानले. यावेळी प्रा.डॉ.एन. यु.मुळे, डॉ. सतीश ससाणे, डॉ.मारोती कसाब, डॉ.बी.के. मोरे, डॉ.पी.बी.बिरादार, ग्रंथपाल प्रा.परमेश्वर इंगळे, डॉ.पी.पी. चौकटे, प्रा. अतिश आकडे, डॉ.डी.एन.माने, डॉ. सचिन गर्जे, डॉ. संतोष पाटील, कार्यालय प्रमुख प्रशांत डोंगळीकर यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारी कोवीड-१९च्या नियमांचे पालन करून उपस्थित होत.