रोटरी क्लब तर्फे उस्मानिया उर्दू हायस्कूल येथे वृक्षारोपण

रोटरी क्लब तर्फे उस्मानिया उर्दू हायस्कूल येथे वृक्षारोपण

अहमदपूर (गोविंद काळे) : रोटरी क्लब अहमदपूर तर्फे उस्मानिया उर्दू हायस्कूल काळेगाव रोड येथे वृक्ष संवर्धन व वृक्ष चळवळीचा भाग म्हणून वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी करंज, कडुलिंब, पिंपळ, कांचन, आकाश मोगरा आदी वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. या वृक्ष लागवडीच्या वेळेस प्रा अनिल चवळे रोटरीचे सचिव राहुल घाटोळ अरबी मदरसा चे मुख्याध्यापक सय्यद युसुफ सय्यद नूर, उस्मानिया हायस्कूलचे मुख्याध्यापक शेख वहाब हमीद,शिक्षक मेराज सर,इरफान सर, इब्राहिम सर, श्रीराम कलमे, प्रा रविकुमार पुणे, सुदर्शन कराड आदी उपस्थित होते या वृक्षाचे पूर्णपणे संगोपन करण्याचे आश्वासन यावेळी मुख्याध्यापक शेख वहाब सर यांनी दिले मागील तीन वर्षांपूर्वीच या शाळेच्या प्रांगणामध्ये लावलेल्या वृक्षांचे ही शाळेच्या वतीने पूर्णपणे संगोपन करण्यात आले आहे ही आनंदाची बाब आहे असे मत रोटरीच्या सदस्यांनी यावेळी व्यक्त केले.

About The Author

error: Content is protected !!