यशच्या डोळ्यातुन आनंदाश्रु आले
लातूर (प्रतिनिधी) : मागील १० दिवसांपूर्वी अंदाजे १३ वर्ष वयाचा मुलगा श्री यश लासुरे याला रात्री सात साडेसातच्या सुमारास गायत्री हाॅस्पीटल लातुर येथे त्यांचे आजोबा श्री शंकर सुरयवंशी व आई वैशाली लासुरे हे घेवुन आले .मुलगा अत्यवस्थ असल्यामुळे लागलीच कुठलीही वेळ न घालवतां श्वसन विकार व छातीविकार तज्ञ डाॅ रमेश भराटे यांनी यश ची तपासणी करुन अतिदक्षता विभागात ऊपचार सुरु केले. ऊपचार करत असताना डाॅ भराटे यांनी सखोल तपासणी करुन रुग्णांच्या श्वसन नलिकेमध्ये बाधा असण्याची शक्यता वर्तवली व व्हिडीओ असिस्टेड ब्राॅंकोस्कोपी करुन निदान करण्याचे निश्चित केले. दुर्बीनी द्वारे तपासणी करत असताना रुग्णाच्या स्वर यंत्रणे मध्ये दोष असल्याचे डाॅ भराटे यांच्या निदर्शनास आले तसेच स्वर यंत्र (वोकल कॅार्ड) जवळ जवळ नव्वद टक्के बंद असेल्याचे निदर्शनास आले .या परिस्थितीला वैदकिय परिभाषे मध्ये बायलॅटरल ॲबडकटर पाल्सी असे संबोधण्यात येते असे डाॅ भराटे यांनी नमुद केले. लागलीच मुलाची लेझर थेरपी करुन स्वर यंत्र व श्वसन नलिका दोन्ही वाचवण्यात यश आले. त्याबदद्ल डाॅ भराटे व गायत्री हाॅस्पीटल मधील त्यांच्या चमुचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. अधिक चौकशी केली असतां अशी घटना दुर्मिळ असुन वेळीच ऊपचार करणे आवश्यक असते असे डाॅ भालचंद्र पैके व पुण्याचे डाॅ सचिन गांधी यांनी नमुद केले.