प्रत्येक गावातील समस्या शासन दरबारी मांडणार – अविनाश दादा रेशमे
निलंगा (भगवान जाधव) : शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब व युवा सेनाप्रमुख अदित्य साहेब ठाकरे, मराठवाड्याचे शिवसेनेचे नेते तथा संपर्कप्रमुख चंद्रकांतजी खैरे साहेब यांच्या संकल्पनेतून आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने साहेब यांच्या आदेशा वरून शिवसेनेच्या “जनसंवाद मोहिमेअंतर्गत” निटूर जिल्हा परिषद सर्कल मधील दगडवाडी, गौर, आनंदवाडी व मसलगा या गावातील जनतेशी शिवसेनेचे तालुकाप्रमुख अविनाश दादा रेशमे यांनी संवाद साधला. गावातील वयोवृद्ध लोकांच्या संजय गांधी निराधार योजनेच्या पगाराविषयी, महिला बचत गटासाठी लघुउद्योगा संदर्भात, बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात चर्चा केली गावातील लोकांनी अंतर्गत रस्ते, शिव रस्ते, पानंद रस्ते तसेच डीपीच्या प्रश्नासंदर्भात अनेक तक्रारी शिवसेना तालुकाप्रमुख अविनाश दादा रेशमे यांच्यासमोर मांडल्या त्या सर्व समस्याची नोंद घेऊन त्या सर्व समस्या शिवसेनेच्या माध्यमातून सोडवल्या जातील असे वचन शिवसेना तालुकाप्रमुख अविनाश दादा रेशमे यांनी गावकर्यांना दिले व गावकऱ्यांशी मनमोकळेपणे संवाद साधला. सोबत युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा.आण्णासाहेब मिरगाळे, युवासेना तालुकाप्रमुख प्रशांत वाजरवाडे, लाईकपाशा शेख व गावातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.