काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश
उदगीर ( अॅड.एल.पी.उगीले ) : नगरपरिषद पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची आवक सुरू झाली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष सय्यद जानिया मोहम्मद हनीफ यांच्यासह त्यांचे शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. याप्रसंगी राज्याचे सार्वजनिक बांधकाम, पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, संसदीय कार्य, रोजगार हमी राज्यमंत्री ना. संजय बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, उदगीर पंचायत समितीचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवाजी मुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंदन भैय्या पाटील नागराळकर, ज्ञानेश्वर पाटील, गजानन सातारकर, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अल्पसंख्यांक असेल अजीम दायनी, युवकांचे प्रदेश सरचिटणीस इम्तियाज शेख, शेख समद, जिल्हा कार्याध्यक्ष अल्पसंख्याक विभागाचे शफी हाश्मी, अजहर मोमीन, अजय शेटकार, शक्ती बलांडे, विजय भालेराव, बाबुराव आंबेगाव, अबरार पठाण, शेख सलीम, शेख जयद, बापू सोळुंके, इरफान सय्यद, सैफ हाशमी, नामदेव भोसले व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. राज्यमंत्री ना. संजय बनसोडे व प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर यांनी सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत केले.