अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई द्या मनसेची मागणी
उदगीर : काही दिवसापूर्वी केंद्र शासनाने विदेशातून सोया पेंड आयात करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे सोयाबीनचे 11000 वरील भाव 5 ते 6 हजारावर आले केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसल्यामुळे शेतकरी अगोदरच अडचणीत आला असून प्रथमतः आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून केंद्रशासनाच्या शेतकरी विरोधी भूमिके बाबत जाहीर निषेध करतो .
केंद्र शासनाच्या चुकीच्या निर्णयामुळे अडचणीत आलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना गेल्या 10 दिवसात पुन्हा नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागत आहे सध्या सोयाबीनचे पीक काढणीला आले आहे त्यामुळे सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी काढणीला आलेले पीक तसेच शेतात उभे राहिल्यामुळे ते जागीच वाफण्याची शक्यता निर्माण झाली असून ज्या शेतकऱ्यांनी रास केली आहे त्यांचे सोयाबीन जमिनीवर पसर असल्यामुळे त्यांना बुरा लागून नसण्याची शक्यता आहे वरील परिस्थितीमुळे सोयाबीनसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे व नैसर्गिक संकटामुळे उदगीर तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीनसह इतर पीक शेतीचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाने नुकसानग्रस्त शेतकर्याना नुकसान भरपाई म्हणून हेक्टरी 50 हजार रुपये द्यावे तसेच पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून त्वरित विमा मंजूर करून ती ही रक्कम त्वरित देण्यात यावी.
सदर मागण्या मान्य करून घेण्यासाठी दिनांक 01/10 /2021 रोजी सकाळी 11 वाजता उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेना उदगीर च्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात येणार आहेत याची नोंद घ्यावी या निवेदनावर उपजिल्हाध्यक्ष संजय राठोड, तालुकाध्यक्ष ग्राम रोडगे, शहराध्यक्ष अभय सूर्यवंशी, उपजिल्हाध्यक्ष शेतकरी सेना रामदास पाटील, तालुका उपाध्यक्ष गंगाधर पिटाळे, तालुका अध्यक्ष व्यापारी सेना योगेश चिद्रेवार, तालुका उपाध्यक्ष शेतकरी सेना गजानन तळभोगे,शहर उपाध्यक्ष संतोष भोपळे, श्रीकांत बिरादार ,गणेश चिद्रेवार, नागेश सांगवे,रमेश सदानंद आदी पदाधिकारी उपस्थित होते.