उस्मानाबाद येथे गुणीजन शिक्षकांचा गौरव सोहळा संपन्न

उस्मानाबाद येथे गुणीजन शिक्षकांचा गौरव सोहळा संपन्न

उस्मानाबाद (सागर वीर) : वृंदावन फाऊंडेशन, विवेक व्यासपीठ, श्री साई श्रद्धा एज्युकेशन नीट ऑनलाइन टेस्ट सीरीज व स्फूर्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उस्मानाबाद मध्ये गुरुजन गौरव सोहळा संपन्न करण्यात आला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून विद्या भारती चे पश्चिम क्षेत्र मंत्री श्री शेषाद्री आण्णा डांगे कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून तर शिक्षण महर्षी सुभाष दादा कोळगे यांच्या हस्ते शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. पाहुणे म्हणून  हभप बाबूराव भाऊ पुजारी, अॅड. पांडुरंगजी लोमटे उपस्थित होते. तसेच  या कार्यक्रमाला सतीश कोळगे, महेश कळवावे, डॉ. मनीष देशपांडे, डॉ. हर्षद रजवी उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रा. डॉ. सहदेव रसाळ, श्री सुनील बुट्टे, प्रा. सविता दूधभाते, प्रा. परमेश्वर शिरसागर, प्रा. समाधान बेदरे, दीपक हजारे, प्रज्ञा कुलकर्णी, संभाजी गीड्डे, उदय पाटील, चिंटू आगळे, विशाल जमाले, बाबासाहेब घोगरे, प्रा. दमयंती पाटील यांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमामध्ये उपक्रमशील शाळा म्हणून येरमाळा येथील विद्यानिकेतन हायस्कूलचा सुद्धा गौरव करण्यात आला. अतिशय शानदार सोहळ्यामध्ये सन्मानपत्र ग्रंथ व गुलाब पुष्प देऊन गुनिजन व उपक्रमशील शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून वृंदावन फाउंडेशनचे सचिन पाटील श्री साई श्रद्धा एज्युकेशन चे प्रा. सोमनाथ लांडगे स्फूर्ती फाऊंडेशनचे शिवाजीराव गीड्डे, प्रा. नागेश गोटे, अनिकेत कोळगे, महारुद्र जाधव यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन पाटील यांनी केले तर आभार प्रा. सोमनाथ लांडगे यांनी केले. या गुनिजन व उपक्रमशील शिक्षकांना पुरस्कार मिळाल्याबद्दल शिक्षकांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

About The Author

error: Content is protected !!