भक्ती गीत गायन स्पर्धेचे निकाल जाहिर
अहमदपूर (गोविंद काळे) : समाजातील प्रत्येकाकडे एखादा तरी कलागुण असतो. त्या कलागुणांच्या माध्यमातून,संगीत कलेवर आधारित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा सृजन बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा मानस आहे. त्या अनुषंगाने श्रावण महिन्यात सर्वत्र भक्तिमय व भक्तिरसाचा गंध दरवळत असतो. संस्थेच्या वतीने मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्य श्रावण महिन्यात आँनलाईन ‘भक्ती गीत गायन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेचा निकाल संगीत शिक्षक शिवकुमार गुळवे सर यांच्या हस्ते यूटूब लिंकच्या माध्यमातून घोषित करण्यात आला.
सदरील स्पर्धा दोन गटात घेण्यात आली.पहिला गट १ली ते ७ वी व दुसरा हा खुला गट होता.या दोन्ही गटाचा निकाल पहिल्या गटातून प्रथम – भक्ती प्रशांत पाटील,द्वितीय – सृष्टी मनोज भूतडा,तृतीय- चैतन्य भिमराव पोले तर खूल्या गटातून प्रथम – आकांक्षा कुलकर्णी, द्वितीय – उषा उत्तमराव सुडे,तृतीय- आरती पोतवळे यांनी क्रमांक पटकाविला आहे. संगीताची आवड आणि गीत गाणारा गळा असलेल्या तमाम संगीतप्रेमींना त्यांचा घरी राहून लॉकडाऊन मध्ये ही संधी चालून आली होती.यासाठी सृजन संस्थेने ऑनलाईन व्यासपीठ उपलब्ध करून दिलं होतं.
ऑनलाईन गायन स्पर्धेचं आयोजन केले.या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कुठलेही शुल्क आकारले नाही. इच्छुक स्पर्धकांनी आपल्या आवाजातील एक व्हिडिओ रेकॉर्ड करुन पाठवून द्यावयाचा होता. सदरील स्पर्धा ही आँनलाईन पद्धतीने राबविण्यात आली होती.सर्व सहभागी विद्यार्थ्यांना आँनलाईन ई-प्रमाणपत्र व गुणवंत विद्यार्थ्यांना फोन पे द्वारे रोख रक्कम व गुणवत्ता प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. वरील स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संगीत शिक्षक शिवकुमार गुळवे,किरण खमितकर,महादेव खळुरे,अविनाश धडे,दिपक जगताप, सलिम आतार, मल्लपा खळुरे, आदिनी परिश्रम घेतले.