सावरी ते जवळगा तेरणा नदीवरील पुल धोकादायक
डी. वाय. एसपी. दिनेश कोल्हे व एपीआय.संदीप कामत यांची त्वरित पाहणी
औराद (भगवान जाधव) : गेल्या सहा सात दिवसांपासून सतत पाऊस पडत असल्यामुळे येथून जवळच सावरी गावालगत असणाऱ्या तेरणा नदीवरील माकणी धरणाचे सर्वच दारे उघडल्यामुळे तेरणा नदी दुथडी भरून वाहत आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या नदीवरील सावरी गावालगत एका पुलावर भलामोठा खड्डा पडला आहे. ही माहिती मिळताच औराद शहा.पोलिस ठाणे ए पी आय संदीप कामत यांनी आपल्या वरिष्ठांना संपर्क साधून त्वरित त्यांना सोबत घेऊन सावरी गाठले व त्या पुलाची माहिती घेऊन संबंधित अधिकारी यांच्याकडे संपर्क साधत पुलावरून ये जा करणाऱ्या अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली.
गावातील नागरिकांना बोलून या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वाहनांना धोका असल्याने या पुलावर दगड व फलक लावण्यात आले. यामध्ये जवळगा गावचे नागरिक संदीप मोरे, पोलिस पाटील कुमार पाटील तर सावरीचे पप्पू पाटील, पोलिस कर्मचारी काळे हजर होते.