भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन

भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन पिक काढणीस आले असताना सोयाबीन व इतर पीकाचे अतोनात नुकसान झालेले आहे त्यामुळे महाराष्ट्रातील आघाडी सरकाराने शेतकऱ्यांना 50 हजार रुपये हेक्टरी रक्कम देऊन नुकसानभरपाई देण्यात यावी अहमदपूर चाकूर तालुक्यामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटामध्ये सापडलेल्या आहे यामुळे सरकारने शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देऊन व विमा लागू करण्यात यावा.असे निवेदन भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीने दिलीपराव देशमुख यांनी उपजिल्हाधिकारी यांना दिले.

यावेळी बालासाहेब गुट्टे (उपसभापती पंचायत समिती) ॲड जगताप, (अध्यक्ष सरपंच संघटना) दत्ता गोरे (तालुका उपाध्यक्ष भाजपा) प्रकाशराव देशमुख हाळणीकर (माजी सरपंच) जब्बार पठाण (माजी नगरसेवक) आण्णाराव पाटील गौतम शिंदे,द्वारकादास नाईक, संजय दुधाटे व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author