स्वाभिमानी शिक्षक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी बाबासाहेब वाघमारे यांची निवड
अहमदपूर (गोविंद काळे) : महाराष्ट्रातील विनाअनुदानित शिक्षकांच्या प्रश्नांवर वेळोवेळी रस्त्यावर उतरून शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव कार्यरत असलेली संस्थापक अध्यक्ष के पी पाटील, महिला आघाडीच्या प्रमुख नेहाताई गवळी यांच्या स्वाभिमानी शिक्षक संघटनेच्या लातूर जिल्हाध्यक्ष पदी बाबासाहेब वाघमारे यांची निवड करण्यात आली. अहमदपूर येथे शिक्षक समन्वय संघ अंतर्गत स्वाभिमानी शिक्षक संघटनेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या सहविचार बैठकीत ही निवड करण्यात आली. बाबासाहेब वाघमारे हे अहमदपुर शहरातील लोकराजा माध्यमिक विद्यालय येथे मागच्या पंधरा वर्षापासून सहशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.शिक्षकांच्या प्रश्नांवर वेळोवेळी संघटनात्मक बांधणी करत रस्त्यावर उतरून आंदोलन, मोर्चे, निवेदने देऊन तसेच अनुदान मिळवून घेण्यासाठी मुंबई आझाद मैदानावर लढा, नागपूर हिवाळी अधिवेशन, औरंगाबादमध्ये झालेला मोर्चा वरील लाठीचार्ज, उपसंचालक कार्यालयासमोरील धरणे, शिक्षणाधिकारी कार्यालयात निवेदन देणे व विनाअनुदानित शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना जिल्हाध्यक्ष पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे.निवडीच्या वेळी औरंगाबाद चे शिक्षक क्रांती संस्थापक अध्यक्ष मनोज पाटील,मुप्टा विना अनुदानित शिक्षक शिक्षकेत्तर संघटनेचे शिवराम मस्के,महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक/ कनिष्ठ महाविद्याल कृती संघटनेचे अध्यक्ष दिपक कुलकर्णी, शिक्षक समन्वय संघाचे समन्वयक तथा महाराष्ट्र राज्य उच्च मा/कनिष्ठ मा कृती संघटनेचे उपाध्यक्ष राहुल कांबळे, विभागीय अध्यक्ष संघपाल सोनोने आदि मान्यवर उपस्थित होते.
या निवडीचे स्वागत महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष खंडेराव जगदाळे, नवयुग क्रांती शिक्षक संघटनेचे अध्यक्ष गजानन खैरे, जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव बाबुरावजी पाटील, लोकराजा विद्यालयाचे मुख्याध्यापक आबासाहेब माने,विद्रोही कवी राजेंद्र कांबळे, उत्तम कांबळे, विनयकुमार ढवळे, सहदेव होनाळे, संजय माकेगावकर, रमेश लेंढेंगावकर, मिलिंद कांबळे, राजकुमार भालेराव, निलेश कांबळे,शरद सोनकांबळे सह तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.