कर्नाटकातील सायगाव व कोंगळी पूल पाण्याखाली; मेहकर पोलिस सतर्क
मेहकर (भगवान जाधव) : गेल्या सात आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात अक्षरशः थैमान घातले असून महाराष्ट्र प्रमाणेच कर्नाटका मध्येही पूरस्थिती पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातून कर्नाटक राज्यात जाणाऱ्या तेरणा व मांजरा नद्यांचे संगम औराद शहा.आणि वांजरखेडा येथे होतो. मग पुढे दोन्ही नद्या एकत्र जातात यामुळे पुढील जमखंडी, कोंगली, सायगाव, संगम, भरसंगी व अनेक गावांतील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच सायगाव मेहकर देवणी मार्ग बंद झाला आहे. यामुळे मेहकर पोलिस ठाण्याचे PSI सूर्यकांत यांनी काहीही धोखा दुर्घटना घडू नये यासाठी दोन दिवसापासून रात्र दिवस नदीकाठी आपल्या कर्मचारी आणि स्वतः लोकांना आव्हान करत आहेत कोणीही पाण्यात जाऊ नये आपली जनावरे सुरक्षित ठिकाणी बाधावे गाडी पाण्यात घालू नये धोकादायक प्रवास करू नये यासाठी मेहकर पोलिस ठाण्याचे PSI सूर्यकांत, asi चंदू, गौस, अर्जुन, अंबादास आपली कर्तव्य बजावत आहेत व अडकलेल्या लोकांना लागलेली कोणतीही मदत ग्राम पंचायत सदस्य सतीश निंबाळकर, संतोष बिराजदार, गावातील नागरिक करीत आहेत.