पोलीसांना खुनाची बातमी सांगणारेच ठरले खुनी!!
पुणे (रफिक शेख) : शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये खुडे ब्रिजखाली नदीपात्रामध्ये एक अज्ञात इसमाचा मृतदेह मिळुन आल्याने पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली होती. सदर मृतदेहाचा अधिक तपास करुन तसेच वैदकीय अहवाल प्राप्त होताच सदर अज्ञात इसमाचा खुन झालेचे निष्पन्न झाल्याने शिवाजीनगर पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं. ८६/२०२१ भा.द.वि. कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या दाखल गुन्ह्याच्या तपासा मध्ये तपास पथकातील अंमलदार यांनी तब्बल २५५ सी.सी.टी.व्ही फुटेज बघितले तसेच सदर भागाचे सीडीआर टॉवर लोकेशन डम डाटा काढुन तसेच रस्त्यावर कचरा वेचणारे, भंगाराचे दुकानदार, भिख मागणारे तसेच गोपनीय बातमीदार असे तब्बल ७० ते ७५ लोकांकडे चौकशी केली. परंतु कोणतेही धागेदोरे किंवा उपयुक्त माहीती मिळुन येत नसल्याने तपास अधिकच किचकट बनुन आरोपींपर्यंत पोहचण्याचे सर्व रस्ते बंद झाले असे वाटत असताना दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना श्रीमती अनिता मोरे वरिष्ठ पोलीस निरिक्षक व श्री. विक्रम गौड पोलीस निरिक्षक (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उप निरिक्षक अतुल क्षिरसागर हे स्टाफ सह हद्दीमध्ये तसेच परहद्दीमध्ये फिरुन तपास करत असताना मिळालेल्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तसेच गोपनीय बातमीदाराच्या माहीतीवरुन तसेच तांत्रिक विश्लेषणाचे आधारे दाखल गुन्ह्यातील निष्पन्न आरोपी नामे १) महेश शिवाजी देव उर्फ तंबी वय ३० वर्ष रा. खुडे ब्रिजजवळ शिवाजीनगर पुणे. २) आकाश प्रकाश यादव वय – ३३ वर्ष रा. नवी शनिवार पेठ पुणे यास कौशल्यपुर्ण तपासाच्या आधारे ताब्यात घेवुन त्यांच्याकडे अधिक चौकशी करता त्यांनी खून केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करण्यात आली असुन सध्या पोलीस कस्टडीत अधिक तपासाकामी पोलीसांच्या ताब्यात आहेत.
सदरची कामगिरी मा. अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग श्री. राजेंद्र डहाळे सर श्रीमती प्रियंका नारनवरे पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०१ पुणे शहर मा. श्री. बजरंग देसाई सहाय्यक पोलीस आयुक्त विश्रांमबाग विभाग पुणे शहर तसेच श्रीमती अनिता मोरे वरिष्ठ पोलीस निरिक्षक, विक्रम गौड पोलीस निरिक्षक (गुन्हे) शिवाजीनगर पोलीस स्टेशन पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली व सुचनेनुसार शिवाजीनगर पोलीस स्टेशन कडील तपास पथकाचे पोलीस उप निरिक्षक श्री अतुल क्षिरसागर तसेच अर्जुन नाईकवाडे पोलीस उप निरिक्षक, पो.हवा. अविनाश भिवरे, पो. हवा. रणजित फडतरे, पो. हवा. बशिर सय्यद, पो. हवा. रुपेश वाघमारे, पो. हवा. कांतीलाल गुंड,पोना.संतोष मेमाणे, पो. शि. शरद राऊत, पोशि. अनिकेत भिंगारे, पोशि. राहुल होळकर यांच्या पथकाने तपास करुन उकृष्ट रित्या कामगिरी केली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास श्री विक्रम गौड पोलीस निरिक्षक (गुन्हे) शिवाजीनगर पोलीस स्टेशन हे करत आहेत.