निर्मात्यांना नाट्यनिर्मिती अनुदान पुढील आठवड्यात मिळणार

निर्मात्यांना नाट्यनिर्मिती अनुदान पुढील आठवड्यात मिळणार

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची माहिती

मुंबई : नाट्यनिर्मिती संस्थांना नवीन नाट्य निर्मितीसाठी अनुदान योजनेअंतर्गत असणारे प्रयोग अनुदान पुढील आठवड्यात निर्मात्यांच्या खात्यात जमा होईल. यासाठी चाळीस लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली.

सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यामार्फत नाट्य अनुदान योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत नवीन नाटके, संगीत नाटके, प्रयोगात्मक नाटके यांना निर्मितीसाठी अनुदान दिले जात असते. मात्र काही नवीन नाटकांना सदरील अनुदान मिळाले नव्हते. यासंदर्भात संबंधिताना सूचना दिलेल्या असून लवकरच हे नाट्य अनुदान वितरित केले जाईल, असे श्री. देशमुख यांनी सांगितले आहे. सांस्कृतिक कार्य विभाग नेहमीच नाट्य कलावंत व निर्माते यांच्या पाठीशी उभा असल्याची ग्वाही सांस्कृतिक कार्य मंत्री यांनी दिली आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!